अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेक इव्हेंट्सना हजेरी लावत असते. अलीकडेच तिने मुंबईत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पण याठिकाणी तिने घातलेल्या टॉपमुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे. या इव्हेंटमधील अनुष्काचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत आहेत.

Video: ‘वेड लावलंय’ गाण्यावर नाचता न आल्यामुळे सई ताम्हणकर ट्रोल, नेटकरी म्हणाले, “अभिनेत्री असूनही…”

अनुष्का शर्माने या इव्हेंटमध्ये लिंबू कलरचा ऑफ शोल्डर टॉप आणि जीन्स घातली होती. पण, ती ज्या ठिकाणी गेली होती, ते ठिकाणं बंदिस्त नव्हतं. गार्डनसारख्या मोकळ्या जागेत त्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याठिकाणी वारं वेगाने वाहत होतं. परिणामी अनुष्काचं टॉप व्यवस्थित नव्हतं. तिचे केसदेखील उडत होते. या एकंदरीत परिस्थितीवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.

‘तो’ एक सीन अन् रितेश देशमुखने ‘वेड’मध्ये बदललं खुशीच्या पात्राचं नाव, वाचा रंजक किस्सा

या व्हायरल व्हिडीओमध्ये केस उडत असताना ती केस बांधण्यासाठी थांबते. यावर नेटकऱ्यांनी ‘अनुष्का तू जॅकेट घालायला हवं होतंस,’ ‘इतका पैसा असूनही प्रसिद्धीसाठी कसे कपडे घालतात सेलिब्रिटी’, ‘घरात दुसरे कपडे नव्हते का’, ‘हे कोणते कपडे घातलेय’, ‘नेहमीच तुमचं शरीर दाखवणं गरजेचं असतं का’? अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.

काही नेटकऱ्यांनी तिने त्या परिस्थितीत स्वतःला नीट सांभाळलं याबद्दल कौतुक केलंय. तर, काहींनी रेड हार्ट इमोजी कमेंटही केल्या आहेत.