गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये ‘नेपोटिझम’बद्दल होणारी बरीच चर्चा आपल्या कानावर आली आहे. काहींनी याच्या समर्थनात तर काही सेलिब्रिटीजनी याच्या विरोधात त्यांची मतं मांडली आहेत. नुकतंच अरबाज खान आणि सोहेल खान यांदेखील यावर आपलं मत मांडलं आहे. एखाद्या अभिनेत्याच्या यशाचे श्रेय त्याच्या कुटुंबाला देणे चुकीचे असल्याचे त्यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. सलीम खान यांचा मुलगा आणि सलमान खानचा भाऊ असल्याने आजही त्या दोघांना म्हणावे तसे यश मिळाले नसले तरी ते आज वेगळ्या क्षेत्रात नाव कमवत आहेत.

अरबाज खानने ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “जर तुमचे वडील केवळ फिल्म इंडस्ट्रीतीलच नाही तर एखाद्या वेगळ्या क्षेत्रातले असतील तर तुमच्यासाठी ते फायद्याचेच असते. तुम्हाला तिथे काम करण्याची संधी मिळू शकते. तुमचे वडील डॉक्टर असतील, वकील असतील तर ते तुम्हाला त्या व्यवसायांमध्ये पुढे जाण्यास मदत करू शकतात. त्याचप्रमाणे एक अभिनेता म्हणून आम्हाला हे आमच्या वडिलांमुळे शक्य झालं. आम्हाला ज्या व्यक्तिबरोबर काम करायचे होते त्यांना भेटायची संधी तर लगेच मिळायची पण ती व्यक्ती आपल्याला काम देईलच याची शाश्वती नसे.”

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”

आणखी वाचा : ऑस्करच्या मंचावर रॉबर्ट डाउनी ज्युनियरच्या ड्रग अ‍ॅडिक्शनबद्दल टिप्पणी; जिमी किमेलवर चाहते संतापले

पुढे अरबाज म्हणाला, “जर तुमचे आई-वडील या क्षेत्रात असतील तर तुम्हाला ब्रेक लगेच मिळू शकतो किंवा त्यासाठी फार काही कष्ट घ्यावे लागत नाहीत. पण यामुळे तुमचं करिअर बनेल हे मात्र कुणीच नक्की सांगू शकत नाही. मी आणि सोहेल आमचा भाऊ सलमानसारखे यशस्वी होऊ शकलो नाही. पण तरी आम्ही अजून याच क्षेत्रात राहून वेगवेगळी कामं करत आहोत. इथे कुणीही तुमच्यावर उपकार करत नाही. तुमचे आई वडील किंवा नातेवाईक कितीही मोठे स्टार असो जर तुमचा अभिनय पाहून प्रेक्षक समाधानी नसतील, त्यांना तुम्हाला पाहायची इच्छा नसेल तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये कुणीही उभं करत नाही.”

सलमानचे भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान या दोघांनीही अभिनयात नशीब आजमावलं. एक दोन चांगले चित्रपट सोडले तर त्यांचे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकले नाहीत अन् कालांतराने त्यांनी यातून काढता पायच घेतला. नंतर या दोघांनी निर्मिती आणि दिग्दर्शनात लक्ष घातले अन् सलमानबरोबरच त्यांनी एकाहून एक असे सरस चित्रपटही दिले. सोहेल खान लवकरच आता ‘शेरखान’ या त्याच्या बऱ्याच वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या चित्रपटावर काम सुरू करणार असल्याची चर्चा आहे.