अभिनेता अरबाज खान त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. २४ डिसेंबरला अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसरं लग्न केलं. अरबाजच्या लग्नानंतर त्याच्या एक्स गर्लफ्रेंड जाॅर्जिया अँड्रियानीने ब्रेकअप बद्दल मौन सोडलं आहे. ती म्हणाली, “एका रोमँटिक नात्याचा अंत होणं यासारख्या दु:खद दुसरी गोष्ट नाही. अरबाज हा चांगला माणूस आहे आणि त्याच्या नवीन प्रवासासाठी माझ्याकडून त्याला खूप शुभेच्छा.”

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत जाॅर्जिया म्हणाली, “अरबाज हा खूप चांगला माणूस आहे. आम्ही काही कारणाने वेगळे झालो. त्यानंतरचा एकाकीपणा नक्कीच मला जाणवत राहिल. गोष्टी किंवा माणूस सोडून देणं सोपं नाही, कारण तुम्ही त्या नात्यात अडकले असता. पण जेव्हा नातं संपत तेव्हा एकाला तरी नवीन वाट शोधावीच लागते. सगळं मागे टाकून माझ्या आयुष्यात पुढे जाताना मी अरबाजलाही त्याच्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देते.”

हेही वाचा… प्रसिद्ध अभिनेत्याच्या चित्रपटाचं भररस्त्यात शूटिंग, लोकांनी तक्रार केल्यावर पोलीस पोहोचले अन्…, पाहा Video

जॉर्जियाला विचारण्यात आलं की तिला बॉलीवूड स्टारकडून कधी काही सल्ला मिळाला आहे का? यावर ती म्हणाली, “सलमान खान दिवसातून चार वेळा व्यायाम करतो. पण त्याचे फिटनेस रुटीन माझ्यापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे तो टिप्स शेअर करणार नाही. परंतु, एकदा त्याने सुचवलं होतं की मी माझ्या हेअरस्टाइलमध्ये बदल करावा, जे मला आवडलं नाही आणि ते मी केलंही नाही.”

पूर्वी दिलेल्या ‘पिंकविला’च्या मुलाखतीत जाॅर्जिया म्हणाली होती, “अरबाजबद्दल असलेल्या माझ्या भावना नेहमी तशाच राहतील. अरबाज आणि मलायकाचं नात कधीच आमच्या नात्यामध्ये आलं नाही. कोणाची तरी प्रेयसी म्हणून ओळखलं जाणं मला नक्कीच खूप अपमानास्पद वाटतं. आम्हा दोघांनाही कुठेतरी हे माहीत होतं की आमचं नातं कायमचं टिकणार नाही कारण आम्ही खूप वेगळे होतो.”

हेही वाचा… “विजू आणि मी एकत्र…”, रश्मिका मंदानाचं विजय देवरकोंडाबद्दल विधान; म्हणाली, “प्रत्येक गोष्टीत…”

पुढे जाॅर्जिया म्हणाली, “मला सध्या माझे स्वातंत्र्य आवडत आहे. खरं तर, मला वाटतं स्वातंत्र्य म्हणजे आनंद. स्वातंत्र्य असलं की तुम्ही हवं ते करू शकता हवं तिथे जाऊ शकता आणि आता मला हे सर्व करायचं आहे. म्हणूनच मी आता खूप आनंदी जीवन जगत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोराचं लग्न १९९८ साली झालं होतं, १९ वर्षाच्या संसारानंतर अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. परंतु, त्यांच्या मुलाचं म्हणजेच अरहान खानचं संगोपन त्यांनी एकत्रित केलं.