अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्स आणि बोल्डनेसमुळे कायम चर्चेत असते. ती सध्या अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. मलायकाने सलमान खानचा भाऊ अरबाज खानबरोबर लग्न केलं होतं. लग्नाच्या जवळपास दोन दशकांनी तिने अरबाजपासून घटस्फोट घेतला. या दोघांच्या घटस्फोटाबाबत बरीच चर्चा झाली पण त्यांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण कधीच समोर आलं नाही.

भारतात १५ ऑगस्ट १९४७ नंतर महापुरूष जन्माला येणं बंद का झालं? शरद पोंक्षेंचं वक्तव्य चर्चेत

बऱ्याचदा अरबाज व मलायकाचा घटस्फोट तिच्या कपड्यांमुळे झाल्याचंही म्हटलं गेलं. एकदा अरबाजलाच याविषयी विचारण्यात आलं होतं. अलीकडेच एका मुलाखतीत अरबाज खानला विचारण्यात आलं की मलायकाच्या कपड्यांवर त्याने कधी आक्षेप घेतला होता का? याबाबत अरबाज खान म्हणाला, “मी मलायकाला तिच्या कपड्यांबद्दल कधीच बंधनं लादली नाहीत. मी तिच्या कपड्यांचे नेहमीच समर्थन करायचो. कारण मला माहित आहे की एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी थांबवले तर तो तिच गोष्टी जास्त करतो. त्यामुळे मलायकाच्या फॅशन स्टाइलबद्दल मी कधीच काही बोललो नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांनी रेखाच्याच ओढणीने पतीने घेतला होता गळफास, सुसाईड नोटमध्ये अभिनेत्रीचा उल्लेख करत लिहिलं होतं…

दोघांनीही त्याचं नातं तुटण्याचं स्पष्ट कारण कधीच दिलं नाही. पण दोघांमध्ये मतभिन्नता होती, असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेच दोघेही वेगळे झाले. मलायका अरोराने २०१७ मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन कपूरला डेट करायला सुरुवात केली. दुसरीकडे, अरबाज खान त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.