बॉलिवूड कलाकरांचं अफेअर, रिलेशनशिप, लग्न, घटस्फोट बी-टाऊनला काही नवं नाही. सेलिब्रिटी जोडप्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चा रंगताना दिसते. त्यातलीच एक जोडपं म्हणजे मलायका अरोरा अरबाज खान. २०१७मध्ये दोघं एकमेकांपासून अधिकृतरित्या विभक्त झाले. पण घटस्फोटानंतरही या दोघांचं नातं चर्चेचा विषय ठरतं. याचबाबत आता अरबाजने भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – “फक्त बघून मोकळं व्हायचं” ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्याची तक्रार, समीर चौघुलेंनी चक्क माफी मागितली अन्…

‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरबाजने मलाकाबरोबर असलेल्या नात्याबाबत भाष्य केलं. अरबाज व मलायका मुलगा अरहानचा अजूनही एकत्रित सांभाळ करतात. याचबाबत अरबजाला विचारण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला, “आम्ही दोघंही एकत्रित आमच्या मुलाचा सांभाळ करतो. या कारणामुळे आम्ही दोघंही चर्चेत असतो”.

“मलायका व मी विभक्त जरी झालो असलो तरी आम्ही आमच्या मुलासाठी सगळं काही करत आहोत. आमचा एकच मुलगा आहे. त्यामुळे मुलासाठी यापुढेही आम्ही एकत्रच राहणार”. पुढे अरबाज म्हणाला, “भूतकाळामध्ये जे काही घडलं ते मी आणि मलायका विसरलो आहे. पुढेही आमचं आयुष्य आहे याचा आम्ही विचार केला”.

आणखी वाचा – …तरच करीना कपूर खानचा लेक रात्रीचं जेवण जेवतो, २ वर्षांच्या जेहबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली…

“राग, निराशा, वैर आम्ही विसरलो आहे. आमच्या मुलाला आम्ही या जगात आणलं आहे. त्यामुळे त्याचा सांभाळ करणं ही आमची जबाबदारी आहे”. अरबाज व मलायकाचा मुलहा अरहान हा परदेशात शिक्षण घेत आहे. अरहानबरोबर दोघंही एकत्र आले असतानाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. मुलाचा सांभाळ करण्यामध्ये अरबाज व मलायका कुठेही कमी नाहीत हे वेळोवेळी दिसून आलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arbaaz khan talk about his relation with malaika arora says we forgotten our past for son see details kmd