मलायका अरोरा व अभिनेता अर्जुन कपूर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही एकत्र फिरताना वेळ घालवताना दिसतात. दोघांनी आपल्या नात्याची सोशल मीडियावर कबुली दिली आहे. बऱ्याचदा ते एकमेकांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मलायका गरोदर असल्याची अफवा पसरली होती, ही बातमी ऐकताच अर्जुन आणि मलायकाचा राग अनावर झाला. दोघांनीही सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे. याबाबत ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अर्जुन कपूरने आपली भूमिका स्पष्ट करीत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

हेही वाचा : “दिल तो पागल है…,” २६ वर्षांनी माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर एकत्र; नेटकरी म्हणाले, “फक्त शाहरुख…”

अर्जुन कपूर म्हणाला, “मीडियाने असे काहीही सांगू नये ,ज्यामुळे एखाद्याच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. नकारात्मकता पसरवणे सोपे आहे, कारण अशा गोष्टी लोकांचे लक्ष सहज वेधून घेतात. मला माहिती आहे, एक अभिनेता म्हणून आमचे वैयक्तिक आयुष्य कधीच वैयक्तिक नसते आणि याची जाणीव ठेवत आम्हाला कायम आनंदी राहावे लागते. प्रेक्षकांपर्यंत एखादी गोष्ट पोहोचवण्यासाठी सेलिब्रिटी मीडियाची मदत घेतात. अशा परिस्थितीत माध्यमांनी वस्तुस्थिती तपासल्याशिवाय काहीही गोष्टी लिहू नये.”

हेही वाचा : वर्षाभरानंतरही प्रेक्षकांना ‘चंद्रा’ची भुरळ, गाण्यानं केला नवा रेकॉर्ड; अमृता खानविलकरने शेअर केली खास पोस्ट

अर्जुनने पुढे सांगितले, “आम्हीसुद्धा एक माणूस आहोत याची जाणीव ठेवा. एखाद्याबद्दल आपण एखादी गोष्टी लिहिणार असतो तेव्हा ती वेळोवेळी तपासली पाहिजे. मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत कधीच मीडियापासून काहीही लपवले नाही, आम्हाला वाटले की आपण मीडियावर विश्वास ठेवू शकतो परंतु त्या घटनेचा खरंच खूप परिणाम झाला होता.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : ‘ये जवानी है दीवानी’ला १० वर्ष पूर्ण; दिग्दर्शक अयान मुखर्जीने शेअर केली खास पोस्ट म्हणाला, “रिलीज झाल्यावर मी एकदाही…”

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या जवळपास पाच वर्षांपासून एकमेकांबरोबर आहेत. मलायकाने २०१७ मध्ये अरबाज खानपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता तेव्हापासून ती अर्जुन कपूरला डेट करीत आहे. मलायका आणि अर्जुन अनेकदा सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करून आपले प्रेम व्यक्त करतात.