बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘मिली’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील जान्हवीच्या अभिनयाचं कौतुक होताना दिसत आहे. चित्रपटात जान्हवी जीवन आणि मृत्यूशी लढाई लढताना दिसत आहे. आपली भूमिका जान्हवीने खूपच उत्तम साकारली आहे. प्रेक्षकांबरोबरच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी जान्हवीच्या कामाचं कौतुक केलं आहे. अशात आता जान्हवीचा भाऊ अर्जुन कपूरने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

अर्जुन कपूर त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्याने बालपणापासून ते आतापर्यंतची झलक दाखवली आहे. या फोटोंमध्ये जान्हवी आणि अर्जुन यांच्यात एक खास आणि प्रेमळ बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. पहिल्या फोटोमध्ये अर्जुन कपूर त्याची बहीण जान्हवी कपूरशी मस्ती करताना दिसत आहे. तो जान्हवीचे केस ओढताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये एकमेकांकडे पाहून खुन्नस देताना देताना दिसत आहेत. तर अखेरच्या फोटोमध्ये ‘मिली’चं पोस्टर शेअर केलं आहे. ज्यात जान्हवी घाबरलेली दिसत आहे.

आणखी वाचा- ड्रेसला सेफ्टी पिन लावल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले “उर्फी जावेद…”

अर्जुन कपूरने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, “जान्हवी तुझा मला नेहमीच अभिमान वाटत राहिल. एक कलाकार म्हणून, एक स्टार म्हणून तुझा विकास खूपच दमदार आहे आणि आता कुठे तू सुरुवात करत आहेस हे खरंच आणि खरंच रोमांचक आहे. तू ‘मिली’मध्ये खूपच दमदार काम केलं आहे. तुला असं अभिनय करताना पाहून खूप आनंद होतो.”

आणखी वाचा- Video : त्यांनी पाहिलं, त्या थांबल्या अन्… श्रीदेवी आणि जान्हवी कपूर यांच्यात नक्की काय घडलं? पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘मिली’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर, हा ‘हेलन’ या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. माथुकुट्टी झेवियर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे आणि या चित्रपटाचे निर्माते जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर आहेत. या चित्रपटात सनी कौशल जान्हवीबरोबर मुख्य भूमिकेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिली’ची टक्कर कतरिना कैफच्या ‘फोन भूत’ आणि सोनाक्षी सिन्हाच्या ‘डबल एक्सेल’शी होणार आहे.