अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानचा पती आयुष शर्माच्या कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता आयुष शर्माच्या गाडीला नुकताच मुंबईत अपघात झाला, मात्र तो त्यावेळी गाडीत नव्हता. आयुषचा ड्रायव्हर गॅस स्टेशनकडे जात असताना हा अपघात झाला. मद्यधुंद अवस्थेत एक व्यक्ती बाईक चालवत होती, त्याने आयुषच्या कारला धडक दिली.

‘झूम’ने दिलेल्या माहितीनुसार, खार जिमखान्याजवळ ही घटना घडली. एका मद्यधुंद दुचाकीस्वाराने आयुषच्या कारला धडक दिली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. खार पोलीस स्टेशनच्या पथकाने त्वरीत कारवाई केली आणि बाईकच्या चालकाला ताब्यात घेतलं. त्याच्याविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. या घटनेत आयुषच्या ड्रायव्हरला कोणतीही दुखापत झाली नाही. कारमध्ये फक्त ड्रायव्हर होता इतर कुणीही नव्हतं.

२० व्या वर्षी लग्न, १८ वर्षांची मुलगी अन् १९ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट; मराठमोळी अभिनेत्री करणार दुसरं लग्न? म्हणाली…

दरम्यान, आयुष नुकताच २५ नोव्हेंबर रोजी त्याचे सासरे व दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले होते, त्यात आयुष व अर्पिता दोघेही दिसले होते.

Video: बिग बी आले, विहीणबाईंना भेटले अन्…; अनफॉलो केल्याच्या चर्चांनंतर अमिताभ बच्चन व ऐश्वर्या राय समोर आल्यावर काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुषच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा ‘रुस्लान’ चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काही नवीन कलाकारही दिसतील. यामध्ये सुश्री मिश्रा, जगपती बाबू आणि विद्या मलावदे यांच्याही भूमिका आहेत. ‘रुस्लान’ चित्रपट बॉलीवूडमध्ये त्याला एक नवीन मार्ग तयार करण्यास मदत करेल, अशी आशा आयुषला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, ते चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.