सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माने मुंबईत एक आलिशान रेस्टॉरंट उघडले. या रेस्टॉरंटचे नाव Mercii आहे. हे रेस्टॉरंट मुंबईतील सांताक्रुझ भागात आहे. ९ हजार चौरस फूट परिसरात पसरलेल्या या रेस्टॉरंटमध्ये अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी जेवणाचा आस्वाद घ्यायला येतात.
अर्पिता केतुल व गौरव पारिख आणि अनुज व विकी चुघ यांच्याबरोबर या रेस्टॉरंटची सह-मालकीण आहे. Mercii चा फ्रेंचमध्ये ‘धन्यवाद’ असा अर्थ होतो. हे रेस्टॉरंट दुबईतील क्रिएटिव्ह क्लिनिकच्या कार्लने डिझाईन केलंय. मर्सीमध्ये एक मोठा बार आहे. तसेच डीजे एरियाही आहे. तसेच इथे एक प्रायव्हेट सेक्शन आहे जिथे ३० पाहुणे बसू शकतात, त्या जागेसाठी वेगळा बार आहे.
आंतरराष्ट्रीय शेफ
मर्सीमध्ये ग्रुप कलनरी डायेक्टर डेनिस कोल आहे. डेनिसने यापूर्वी दुबईतील लक्झरी रेस्टॉरंट्समध्ये काम केलंय. अर्पिता व तिचे रेस्टॉरंट पार्टनर केतुल आणि गौरव यांनी डेनिसला निवडलं. त्यांनी काही शेफची भेट घेतली. त्यांनी बनवलेल्या पदार्थांची चव चाखली. पण केतुल व गौरवच्या एका मित्राने डेनिसबरोबर काम केलं होतं, त्याने त्याचं नाव सुचवलं. मग आम्ही त्याने बनवलेले काही पदार्थ खाल्ले. शेवटी त्याची निवड केली.
Mercii मधील Menu
मर्सी येथे ग्राहकांना ऑथेंटिक युरोपियन फूड मिळतं. अर्पिताने मर्सीमधील मेनूतील तिचा आवडता पदार्थ सांगितला. तो म्हणजे क्वाट्रो फॉर्मॅगी (Quattro Formaggi) फोर-चीज पिझ्झा आहे. या पिझ्झाची किंमत १,१०० रुपये आहे. मर्सीतील इतर पिझ्झाच्या किमती ८०० ते १,१०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

अर्पिता खानच्या रेस्टॉरंटमधील महागडे पदार्थ
अर्पिता खानच्या रेस्टॉरंटमधील सर्वात महागडा पदार्थ म्हणजे हर्ब क्रस्टेड लॅम्ब लोइन (Herb Crusted Lamb Loin) होय. याची किंमत १०,००० रुपये आहे. ही मर्सीतील सिग्निचर डिश आहे. तसेच ट्रफल पास्ता ऑन व्हील (Truffle Pasta on Wheel) हा दुसरा महागडा पदार्थ आहे, त्याची किंमत ८,५०० रुपये आहे. तर Teriyaki Salmon, हा आणखी एक महागडा पदार्थ असून त्याची किंमत ४,००० रुपये आहे.
मर्सीमध्ये महागडी वाइन मिळते. इथे खास फ्रान्समधून आयात केलेले शॅम्पेन मिळते, ज्याच्या काही बाटल्यांची किंमत १,८८,५५० रुपये असते. व्हाईट वाईन प्रोसेकोची (White wine Prosecco) किंमत ५०,००० रुपयांपर्यंत असू शकते, तर मेनूवरील सर्वात महागड्या व्हाईट वाईनची किंमत ६९,००० रुपये आहे. सर्वात जास्त किमतीची रेड वाईन सुमारे १,४०,००० रुपयांत आहे. तर कॉकटेलची किंमत ९०० ते १२०० रुपयांपर्यंत आहे.