बॉलिवूडमधील नेपोटीजमबद्दल बरीच चर्चा सोशल मीडियावर होत असते. गेली काही वर्षं याबद्दल बरंच काही बोललं आणि लिहिलं गेलं आहे. सोशल मीडियावर सतत या स्टारकिड्सवर टीका होताना आपण पाहतो. काही महिन्यांपूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. ड्रग्स प्रकरणात अडकल्याने त्याच्यावर चांगलीच टीका झाली होती. शाहरुख खानवरही वैयक्तिक टीका होत होती. आर्यन खानला या प्रकरणार क्लीन चीटही मिळाली पण अजूनही त्याच्याबद्दल चर्चा ही सुरूच आहे.

आर्यन खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार याची चर्चा बरीच वर्षं सुरू आहे. इतर स्टारकिड्सप्रमाणे शाहरुख आर्यनलाही मोठ्या चित्रपटातून पुढे आणणार असल्याच्या चर्चा आपण ऐकल्या असतील. शाहरुखची मुलगी सुहाना ही झोया अख्तरच्या वेबसीरिजमधून पदार्पण करणार आहे, पण अजूनही आर्यन खानच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल कुठेच काही चर्चा नाही.

आणखी वाचा : “संपूर्ण जगाला तुमची…” जावेद अख्तर यांचं मिशेल ओबामांना विनंती करणारं ट्वीट व्हायरल

बॉलिवूड हंगामाच्या बातमीनुसार आर्यन खान हा अभिनेता म्हणून नाही तर एक लेखक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याचं स्पष्ट होत आहे. शाहरुखच्या ‘रेड चिलीज’मध्ये काम करणाऱ्या काही लेखकांबरोबर आर्यन एका स्क्रिप्टच्या लिखाणावर काम करत आहे. लवकरच यातील कलाकारांची नावं ठरवून या वर्षाअखेरपर्यंत चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख, रेड चिलीज किंवा आर्यन खान यांच्याकडून अजूनतरी अधिकृत माहिती मिळाली नसली तरी लवकरच हा प्रोजेक्ट सुरू होणार असल्याहकी माहिती समोर आली आहे. आर्यनने परदेशातून फिल्ममेकिंगचे शिक्षण घेतले आहे, शिवाय त्याला दिग्दर्शन आणि लिखाण यात जास्त रस असल्याचं खुद्द शाहरुखनेही याआधी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लवकरच एक स्टारकीड आपल्याला एका लेखकाच्या भूमिकेत लवकरच बघायला मिळेल अशी शक्यता आहे.