Konark Gowariker Niyati Kanakia Wedding: बॉलीवूडमधील नावाजलेले मराठमोळे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्क गोवारीकरचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. रविवारी (२ मार्च रोजी) मुंबईत कोणार्कने त्याची गर्लफ्रेंड नियती कनकियाशी लग्न केलं. या लग्न सोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली. तसेच उद्योग जगतातील अनेक दिग्गज या लग्नाला उपस्थित होते.

आशुतोष गोवारीकर व सुनीता गोवारीकर यांचा मुलगा कोणार्क यांनी मुलाचं लग्न खूप एंजॉय केलं. ६१ वर्षांचे आशुतोष गोवारीकर मुलाच्या लग्नात मनसोक्त नाचताना दिसले. या लग्नातील आशुतोष यांच्या एका व्हिडीओने लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओत त्यांनी पारंपरिक मराठी टोपी घातली होती.

इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केलेल्या व्हिडीओत आशुतोष गोवारीकर व त्यांची पत्नी पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये ट्विनिंग करताना दिसत आहेत. याचबरोबर आशुतोष यांनी डोक्यावर गांधी टोपी घातली होती. ज्यावर एक सुंदर ब्रोच लावलेला होता. आशुतोष यांच्या या लूकची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

पाहा व्हिडीओ –

कोणार्क व नियती यांचे लग्न पारंपरिक मराठी पद्धतीने पार पडले. नियती कनकिया ही गुजराती आहे.

कोण आहे आशुतोष गोवारीकर यांची सून?

Who is Niyati Kanakia : नियती कनकिया ही नामांकित रिअल इस्टेट डेव्हलबर रसेश बाबुभाई कनकिया यांची कन्या आहे. कोणार्क व नियती मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय करतो कोणार्क गोवारीकर?

आशुतोष व सुनीता गोवारीकर यांना दोन मुलं आहेत. कोणार्क हा थोरला मुलगा असून धाकट्या मुलाचे नाव विश्वांग गोवारीकर आहे. कोणार्क गोवारीकर त्याच्या वडिलांबरोबर काम करतोय आणि चित्रपट निर्मितीचे बारकावे शिकत आहे. भविष्यात तो त्याच्या वडिलांप्रमाणेच चित्रपट उद्योगात काम करण्यास उत्सुक आहे.