दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबाती ‘बाहुबली’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला. राणा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या राणा त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राणा नायडू’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बाहुबली’ चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारुन प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या राणाला एका डोळ्याने दिसत नाही. राणाने २०१६ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत पहिल्यांदा भाष्य केलं होतं. प्रेक्षकांमधील एकाने आईच्या अंधत्वाबाबत सांगताच राणाने त्याचा उजवा डोळा निकामी असल्याचा खुलासा केला होता.

“मला उजव्या डोळ्याने दिसत नाही. मी केवळ डाव्या डोळ्यानेच पाहू शकतो. ज्या डोळ्यांनी मी पाहतो, ते डोळे मला कोणीतरी त्यांच्या मृत्यूनंतर दान केले आहेत. जर मी माझा डावा डोळा बंद केला, तर मला काहीच दिसत नाही. मी काहीच पाहू शकत नाही. मी लहान होतो, तेव्हा एलवी प्रसाद यांनी माझं ऑपरेशन केलं होतं. चांगला अभ्यास कर, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. साहसी बन कारण तुला तुझ्या कुटुंबीयांना सांभाळायचं आहे. एक दिवस दु:ख दूर होईल, पण यासाठी तुला प्रयत्न करुन तुझ्या कुटुंबीयांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील”, असं त्याने सांगितलं होतं.

हेही वाचा>> मराठीतील प्रसिद्ध संगीतकाराच्या लावणीमध्ये झळकणार गौतमी पाटील! गायकाबरोबरचा ‘तो’ फोटो व्हायरल

हेही वाचा>> “किरणजी, मी बारामतीहून सुनेत्रा पवार बोलतीये”, अजित पवारांच्या पत्नीने किरण मानेंना फोन केला अन्…

आता ‘द बॉम्बे जर्नी’ला दिलेल्या मुलाखतीत राणाने यावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. राणा म्हणाला, “आईला दिसत नाही, हे समजल्यावर त्या मुलाला फार वाईट वाटलं होतं. म्हणून मी तेव्हा पहिल्यांदाच माझ्या उजव्या डोळ्याबाबत भाष्य केलं होतं. मला उजव्या डोळ्याने दिसत नाही. पण प्रत्येक गोष्ट सांभाळण्याची एक पद्धत असते, हे मी त्या मुलाला सांगितलं. मी उजव्या डोळ्याने पाहू शकत नाही, म्हणून मी वेगळ्या पद्धतीने काम करतो”.

हेही वाचा>> “तुला वॅक्सिंग करण्याची गरज आहे” हॉट फोटो शेअर केल्यामुळे ४३ वर्षीय अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले “सून येण्याच्या वयात…”

राणाने त्याच्या डोळ्याबाबत भाष्य करताना लहानपणी किडनी ट्रान्सप्लांट झाल्याचाही खुलासा केला. “शारीरिक समस्यांमुळे अनेक लोक त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतात. तुम्ही पूर्णपणे बरे जरी झालात, तरी ओझं घेऊन जगत असता. माझं कार्नियल ट्रान्सप्लांट आणि किडनी ट्रान्सप्लांटही झालं आहे. मी एक टर्मिनेटर आहे, असं मला वाटतं. मी अजूनही जिवंत आहे आणि असंच पुढे जात राहायचं आहे”, असंही पुढे राणा म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bahubali fame actor rana daggubati talk about his blindness and kidney transplant kak
First published on: 16-03-2023 at 11:16 IST