Premium

७० च्या दशकात ‘या’ अभिनेत्रीच्या न्यूड सीनने उडाली होती खळबळ; चित्रपटावर भारतात घालण्यात आली होती बंदी!

एका बॉलीवूड अभिनेत्रीने ७० च्या दशकात न्यूड सीन देऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

simi-grewal
सिमी गरेवाल यांनी चित्रपटात न्यूड सीन देत माजवली खळबळ (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आजही बॉलीवूड अभिनेत्री कितीही पुढारलेल्या असल्या तरी ऑनस्क्रीन न्यूड सीन देणे टाळतात. मात्र, ७० च्या दशकात अशी एक अभिनेत्री होती जिने चित्रपटांमध्ये न्यूड सीन देऊन खळबळ माजवली होती. ७० च्या काळात अभिनेत्री साडी आणि सलवार सूट घालत होत्या. मात्र, अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी चित्रपटात न्यूड सीन देत सगळ्यांना आश्चर्यांचा धक्का दिला होता. आपल्या बोल्ड इमेजमुळे सिमी गरेवाल चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- खऱ्या आयुष्यात विकी कौशलने कतरिनाचा मार खाल्लाय का? कपिल शर्माचा प्रश्न ऐकताच अभिनेता म्हणाला….

सिमी गरेवाल यांनी ‘मेरा नाम जोकर’ (१९७०) चित्रपटात एक सीन चित्रीत केला होता. राज कपूर यांच्या या चित्रपटात सिमी यांना झुडपांच्या मागे कपडे बदलताना दाखवण्यात आले होते. या सीनची खूप चर्चा झाली कारण ७० च्या दशकात असा सीन देणं खूप बोल्ड मानलं जात होतं.

हेही वाचा- सोनाक्षी सिन्हाने मुंबईत खरेदी केले नवीन आलिशान घर; फोटो शेअर करीत दाखवली फ्लॅटची झलक

‘मेरा नाम जोकर’नंतर सिमी गरेवाल यांनी १९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिद्धार्थ’ चित्रपटात न्यूड सीन देऊन खळबळ उडवून दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलीवूडच्या इतिहासातील हा पहिला न्यूड सीन होता. या सीनमध्ये सिमी यांना शशी कपूर यांच्यासमोर नग्नावस्थेत आणि हात जोडलेले दाखवण्यात आले होते. अनेक प्रसिद्ध इंग्रजी मासिकांमध्ये या सीनची चर्चा झाली होती. या सीनमुळे बरेच वादही निर्माण झाले होते. त्यामुळे या चित्रपटावर भारतातही बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा-Video : भर कार्यक्रमात विकी कौशलने कतरिनाला विचारलेलं ‘मुझसे शादी करोगी?’ तिचं उत्तर ऐकताच सलमान खानने…

सिमी गरेवाल यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांना पाहिजे तसे यश मिळाले नाही. सिमी गरेवाल यांनी १९८८ मध्ये सिनेसृष्टीला रामराम ठोकला. त्यानंतर १९९७ मध्ये त्या ‘Rendezvous with Simi Garewal’ या टॉक शोमुळे चर्चेत आल्या. आजही हा शो प्रचंड लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सिमी या सिनेसृष्टीपासून दूर असल्या तरी त्या सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ban of the simi garewal film siddharth in india due to sensational nude scene during the 70s dpj

First published on: 01-06-2023 at 15:55 IST
Next Story
सावत्र भावाला कधीच भेटला नाहीये शाहीद कपूर; वडील राजेश खट्टर इतक्या वर्षांनी खुलासा करीत म्हणाले…