‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून सलमान खान आणि भाग्यश्री ही जोडी रातोरात स्टार झाली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. एका मुलाखतीत अभिनेत्री भाग्यश्रीने सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव आणि त्याच्याबरोबर असलेलं बॉन्डिंग यावर भाष्य केलं होतं. यावेळी भाग्यश्रीने सलमान खानच्या दोन बाजू कशा आहेत हे सांगितलं होतं. त्याचबरोबर सलमानबाबत आपल्याला खूप आदर असल्याचंही तिने म्हटलं होतं.

‘मैंने प्यार किया’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी करण्यात आलेल्या एका फोटोशूटचा किस्सा भाग्यश्रीने सांगितला होता. ती म्हणाली, “एक प्रसिद्ध फोटोग्राफर होते. ज्यांना माझे आणि सलमानचे काही सेन्सेशनल फोटो काढायचे होते. त्यामुळे त्यांनी सलमानला एका बाजूला घेतलं आणि मला अचानक त्याला किस करण्यास सांगितलं. पण मी काही बोलायच्या आधीच सलमानने असं करण्यास नकार दिला.”

आणखी वाचा- ‘तो’ एक कॉल अन् भाग्यश्रीला मिळाला ‘मैंने प्यार किया’, नेमकं काय घडलं?

भाग्यश्री पुढे म्हणाली, “त्यावेळी आम्ही सगळेच नवीन होतो. त्यामुळे त्या फोटोग्राफरला वाटलं की त्याला हवं ते तो आमच्याकडून करून घेईल. मी त्यावेळी तिथेच होते पण सलमान आणि त्या फोटोग्राफरला माहीत नव्हतं की मी सर्वकाही ऐकलं आहे. मी त्यांचं बोलणं ऐकून हैराण झाले होते. मी खूप घाबरले होते. पण सलमानने असं करण्यास नकार दिला आणि माझ्या मनातला त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. पण त्याने एकदा अशा गोष्टी बोलल्या होत्या जेणेकरून मी त्याला वाईट मुलगा समजावं.”

आणखी वाचा- उलटं लटकून हिना खानने केला असा व्यायम, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाग्यश्री म्हणाली, “खरं तर सलमान कधीच कोणत्या तरुणीच्या मागे जात नाही तर तरुणी त्याच्या मागे येतात. ‘मैंने प्यार किया’चं शूटिंग सुरु असताना त्याने एकदा मला सांगितलं होतं की, ‘चांगल्या मुलींनी माझ्यावर प्रेम करू नये असं मला वाटतं.’ त्यावर मी त्याला विचारलं की, ‘असं का?’ तर तो म्हणाला, ‘कारण मला वाटतं की मी चांगला मुलगा नाही. मी एकाच मुलीबरोबर दिर्घकाळ राहू शकत नाही. मी लवकरच कंटाळतो. जोपर्यंत मी यावर गोष्टी कंट्रोल करायला शिकत नाही तोपर्यंत मला वाटतं की मी चांगल्या मुलींपासून दूर राहावं.’ आज जेव्हा आपण सलमानला पाहतो तेव्हा आपल्याला समजतं की त्याने खरंच सांगितलं होतं.”