Actress Bhagyashree Dance On Shaky Song : सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ चित्रपट आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. हा सिनेमा १९८९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. ‘मैने प्यार किया’मध्ये सलमानसह अभिनेत्री भाग्यश्री प्रमुख भूमिकेत झळकली होती. सलमान-भाग्यश्रीची या चित्रपटामधील केमिस्ट्री प्रचंड गाजली होती.

भाग्यश्रीने लग्नानंतर चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. आता अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. भाग्यश्रीच्या मुलाचं नाव अभिमन्यू असून तिच्या मुलीचं नाव अवंतिका दसानी आहे. अवंतिका सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असते. नुकताच या मायलेकींनी मिळून संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. ‘एक नंबर, तुझी कंबर…’ म्हणत भाग्यश्री या ट्रेंडिंग गाण्यावर लेकीसह थिरकली आहे. भाग्यश्री व अवंतिकाचा डान्स व्हिडीओ पाहून संजू राठोडने “सुंदर…” व पुढे हार्ट इमोजी देत खास कमेंट केली आहे.

भाग्यश्री व्हिडीओ शेअर करत लिहिते, “किती सुंदर गाणं आहे…मी व माझी मुलगी अवंतिका आम्हा दोघींना या सुंदर गाण्यावर डान्स करताना खूपच मजा आली. संजूने ‘गुलाबी साडी’नंतर पुन्हा एकदा हे छान गाणं आमच्या भेटीला आणलंय…मस्तच”

भाग्यश्रीच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “भाग्यश्री मॅम रॉक्स”, “वॉव किती सुंदर डान्स केला”, “भारीच मॅडम”, “मायलेकींची सुंदर जोडी”, “भाग्यश्री मॅम तुम्हाला खूप प्रेम किती सुंदर डान्स केलाय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या डान्स व्हिडीओवर दिल्या आहे.

अभिनेत्रीने ‘शेकी’ गाण्यावर डान्स करताना सुंदर अशी गडद हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तर, भाग्यश्रीच्या लेकीने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. डान्ससह या दोघींच्या सुंदर लूकने सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाला संजूच्या ‘शेकी’ गाण्याची भुरळ पडली आहे. इन्स्टाग्राम ते फेसबुकपर्यंत सोशल मीडियावर सर्वत्र हे गाणं सध्या ट्रेंड होत आहे.