Divya Agarwal Wedding : ‘बिग बॉस’ ओटीटी विजेती व Splitsvilla फेम अभिनेत्री दिव्या अग्रवालने बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरबरोबर लग्नगाठ बांधली आहे. २० फेब्रुवारीला चेंबुरमधील राहत्या घरी या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. डिसेंबर २०२२ मध्ये दिव्याच्या वाढदिवशी अपूर्वने तिला लग्नाची मागणी घातली होती. तेव्हापासून अभिनेत्रीचे चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.

आठवड्याभरापूर्वी दिव्याने अपूर्वबरोबर मुंबईतील राहत्या घरी लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं. १८ फेब्रुवारीला या दोघांचा संगीत, तर १९ तारखेला मेहंदी सोहळा पार पडला होता. आज दिव्या-अपूर्वने सप्तपदी घेत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

हेही वाचा : विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, बाळाचं नाव ठेवलं…

दिव्याने तिच्या लग्नातील सुंदर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “आजपासून आमच्या प्रेमकहाणीचा नवा प्रवास व अध्याय सुरू झाला” असं म्हटलं आहे. अभिनेत्रीने लग्नात जांभळ्या रंगाचा लेहेंगा तर, अपूर्वने पत्नीच्या लेहेंग्याला मॅचिंग अशी शेरवानी परिधान केली होती. दोघेही या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होते.

हेही वाचा : Video: आली समीप लग्नघटिका! जॅकी-रकुलच्या लग्नाला पोहोचली देशमुखांची धाकटी सून, पापाराझींची केली विचारपूस

कोण आहे अपूर्व पाडगावकर?

दिव्याचा नवरा अपूर्व पाडगावकर हा मराठी उद्योजक म्हणून ओळखला जातो. तो मुंबईतील अनेक नामांकित रेस्टॉरंट्सचा मालक आहे. दिव्या व अपूर्वची अनेक वर्षांपासून मैत्री होती. अखेर २०२२ मध्ये दिव्याला त्याने लग्नासाठी मागणी घातली. आज या दोघांचा विवाहसोहळा पार पडला असून सध्या मनोरंजनविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Story img Loader