बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने काही दिवसांपूर्वी आई झाल्याची गुडन्यूज दिली होती. त्यानंतर आता अभिनेत्री बिपाशा बासूनेही चाहत्यांना आई झाल्याची गुडन्यूज दिली आहे. बिपाशा बासूने नुकतंच तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण सिंह ग्रोवर यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. नुकतंच याबद्दलची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर हे दोघेही सातत्याने चर्चेत होते. बाळाची गुडन्यूज दिल्यापासून ते दोघेही चर्चेत आले होते. बिपाशा बासूने तिच्या गरोदरपणाच्यावेळी फोटोशूटही केले होते. त्याबरोबर काही दिवसांपूर्वी तिच्या डोहाळे जेवणाचीही प्रचंड चर्चा रंगली होती. यानंतर ती प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्याचे व्हिडीओ समोर आले होते.
आणखी वाचा : Alia-Ranbir Blessed with Baby Girl : आलिया-रणबीर झाले आई-बाबा, कपूर कुटुंबात छोट्या परीचं आगमन

अखेर बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झालं आहे. बिपाशा बासूने हिने सकाळी रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. सध्या बिपाशा आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. या गोड बातमीनंतर चाहत्यांनी त्या दोघांवर आनंदाचा वर्षाव सुरु केला आहे.

आणखी वाचा-मुलीच्या जन्मानंतर अलियाच्या पोस्टवर दीपिका- कतरिनाच्या प्रतिक्रिया, कमेंटने वेधलं लक्ष

काही दिवसांपूर्वी बिपाशाने तिचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात तिने ‘बेबी ऑन द वे’ असं लिहिलं होतं. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनीही कमेंट करत बाळासाठी आतुर असल्याचं म्हटलं होतं. अखेर बिपाशाची प्रसूती झाली असून तिने मुलीला जन्म दिला आहे. तिच्या या बातमीनंतर चाहते फारच खूश असल्याचे पाहायला मिळत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘अलोन’ सिनेमाच्या वेळी बिपाशा आणि करणची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. करणचं बिपाशासोबतच हे तिसरं लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेटशी लग्न केलं होतं. मात्र ही दोन्ही लग्न फार काळ टिकू शकली नाहीत. बिपाशाला एक वर्ष डेट केल्यानंतर करण आणि बिपाशाने लग्न केलं. दोघांच्या लग्नाला आता सहा वर्ष पूर्ण झाली आहेत.