बॉलिवूडमधील आदर्श जोडपं म्हणून रितेश जिनिलिया, करीना सैफ. शाहरुख गौरी यांच्याकडे बघितलं जात. यांच्याबरोबरीने आखीन एक नाव घेतलं जात ते ऐश्वर्या राय अभिषेक बच्चन यांचं, एकत्र काम करून त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. आज बच्चन घराण्याची सुनबाई म्हणून ऐश्वर्याकडे बघितले जाते. ऐश्वर्या आज जरी लाखो दिलांची धडकन असली तरी अभिषेकला मात्र तिच्या कोणत्या गुणांची भूरळ पडली हे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.

अभिषेक बच्चन बॉलिवूड हंगामाला “मला वाटते की पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया श्रेष्ठ आहेत हे आपण मान्य करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला माहित असेलच त्या फक्त गोष्टींना दृष्टिकोनात ठेवतात. माझी पत्नी त्यात अपवादा‍त्मक आहे तिने कायमच मला भावनिक आधार दिला आहे. माझ्याप्रमाणे माझे कुटुंबदेखील भाग्यवान आहे”.

जान्हवी कपूरने मल्टिप्लेक्समध्ये विकले पॉपकॉर्न; कारण…

ऐश्वर्याविषयी बोलताना अभिषेक पुढे म्हणाला, “ती तिच्या आयुष्यातील काही कठीण प्रसंगांना सामोरी गेली आहे याबाबतीत मी तिची प्रशंसा करतो. अभिनेते भावनिक असतात. आपण खूप अतिसंवेदनशील आहोत”. या शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. २००७ साली अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न झाले. दोघांना आज एक मुलगी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला अभिनय क्षेत्रात आता जवळपास २५ वर्षे झाली आहेत. एवढ्या मोठ्या करिअरच्या काळात ऐश्वर्याने रोमँटिक, थ्रीलर, अॅक्शन, ऐतिहासिक असे सर्व प्रकारचे चित्रपट केले आहेत. अलिकडेच तिचा प्रदर्शित झालेला ‘पोन्नियन सेल्वन १’ बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. ऐश्वर्याच्या अभिनयाचं बरंच कौतुकही झालं.