बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या ‘द नाइट मॅनेजर पार्ट २’ या वेब सीरिजमुळे चांगलाच चर्चेत आहे. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यामध्ये अभिनेत्याने ‘शान सेनगुप्ता’ची भूमिका निभावली असून त्याच्या कामाचं कौतुक केलं जात आहे; तर दुसऱ्या बाजूला अजूनही आदित्य आणि अनन्या पांडेच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. नुकतेच दोघं ‘बार्बी’ चित्रपट बघायला एकत्र गेले होते. त्यासंबंधित दोघांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. अशातच आता अभिनेत्याचा विमानतळावरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

‘फिल्मी ग्यान’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आदित्य रॉय कपूरचा हा विमानतळावरील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेता गाडीतून उतरल्यावर विमातळाच्या दिशेने चालताना दिसत आहे. पण, या दरम्यान आदित्यला लक्षात येतं की, त्याच्या पॅन्टचं बटण खुलं आहे. त्यामुळे तो पॅन्टचं बटण लावतो आणि पुढे विमानतळाच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – ‘लोकमान्य’ मालिकेच्या सेटवर ‘शोले’ चित्रपटाचे झालेले शूटिंग; अभिनेत्याने सांगितला ‘तो’ सीन

हेही वाचा – जेव्हा अभिनेता सिद्धार्थ जाधवला भेटतात बेवडे फॅन; स्वतः किस्सा सांगत म्हणाला, “उत्साहाच्या भरात…”

पॅन्टचं बटण लावतानाचा आदित्यचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे, तर काही जण आदित्यच्या समर्थनार्थ बोलले आहेत. एक नेटकरी म्हणाला की, “आजकाल पापराझी विसरलेत की, सेलिब्रिटीपण माणूस आहे. जे काही सर्वसामान्य माणूस करतो, ते सेलिब्रिटीही करतो”; तर दुसऱ्या नेटकरीनं लिहिलं आहे की, “माणूस आहे तो. आता पॅन्टचं बटण लावण्यासाठी असिस्टंट ठेवणार का?”

हेही वाचा – Bigg Boss OTT 2: ‘वेड’ फेम जिया शंकरने खासगी आयुष्याबद्दल केला खुलासा, म्हणाली, “एकट्या आईबरोबर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आदित्यच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो अभिनेत्री सारा अली खानबरोबर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पहिल्यांदाच आदित्य व साराची जोडी ‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.