बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार, खिलाडीप्रमाणे बॉलिवुडमधील सर्वात महागडा कलाकार अशी त्याची ओळख आहे. मागच्या वर्षी आलेल्या अक्षयच्या चित्रपटांनी फारशी कामगिरी केली नसली तरी त्याने आपल्या मानधनात कोणतीही कमतरता केलेली नाही. जसा तो सर्वाधिक मानधन घेण्यासाठी ओळखला जातो तसा तो सर्वाधिक कर भरणारा देशातील एकमेव अभिनेता म्हणून ओळखला जातो. नुकतंच त्याने यावर भाष्य केलं आहे.

अक्षय कुमार सध्या चर्चेत आहे नुकताच त्याचा ‘सेल्फी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आजतकला दिलेल्या मुलाखतीत तो असं म्हणाला, “तुम्ही तुमचा कर भरला तर ते तुमच्याशी बोलतील, मला चांगलं वाटतं जेव्हा एका अकाउंटंटचा मुलगा बरोबर कर भरतो. माझे वडील मला सांगून गेले आहेत बेटा आपला कर बरोबर भरत जा. मला हे नको आहे की घरी कोणीतरी येईल आणि म्हणेल माल कुठे लपवून ठेवला आहे?” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

‘हेरा फेरी ३’ मध्ये असणार ‘हा’ ट्विस्ट; खुद्द परेश रावलांनी केला खुलासा

या मुलाखतीत त्याने कॅनडाच्या नागरिकत्वावरदेखील भाष्य केलं आहे. ९० च्या दशकात त्याचे चित्रपट चालत नव्हते म्हणून त्याने कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. मात्र त्याचे २ चित्रपट सुपरहिट ठरले आणि त्याने इथेच थांबण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा ‘सेल्फी’ २४ फेब्रुवारीला ‘प्रदर्शित झाला आहे. यांच्याबरोबरच नुशरत भरूचा, डायना पेंटि या अभिनेत्रीसुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच अक्षय आता ‘हेराफेरी ३’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटांवर काम करत आहे.