अभिनेता गुलशन ग्रोव्हर बॉलिवूडमधील नामवंत कलाकारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. ‘बॅड मॅन’ या नावाने लोकप्रिय असलेल्या गुलशन ग्रोव्हर यांनी हिंदी चित्रपटांबरोबरच इंग्रजी चित्रपटांमध्येही आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मुलाखतींमधून, कार्यक्रमांमधून बॉलिवूडबद्दल, खासगी आयुष्याबद्दल खुलासा करत असतात. नुकताच त्यांनी एका मुलाखतीत चित्रपटात काम करत असताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता.
गुलशन ग्रोव्हर यांनी आजवर ४००हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मनीष पॉलबरोबर बोलताना त्यांनी सेटवर तयार होण्यासाठी त्यांना ३ ते ४ तास लवकर पोहचावे लागायचे. ते असं म्हणाले, “त्यावेळी मेक-अप रूम्स नव्हत्या, आम्हाला बाहेर किंवा घरात तयार व्हावे लागले. अनेक वेळा आम्ही गाडीतच मेकअप करायचो. ते पुढे म्हणाले, त्यावेळी महागड्या व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या आम्हाला झाडाखाली बसून मेकअप करावा लागत असे.”
इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून शिव ठाकरेकडे चाहतीने केली विचित्र मागणी; म्हणाली “मला बॉयफ्रेंड…”
व्हॅनिटी व्हॅन नसल्याने अनेकदा चित्रीकरण संपून एखाद्या कार्यक्रमासाठी जायचे असल्यास आमची पंचाईत व्हायची. कित्येकदा त्यांनी झाडाखाली अंघोळ केली आहे आणि तयार होऊन गेले आहेत. ते असं म्हणाले, “स्टुडिओमध्ये किंवा झाडाखाली आंघोळ करावी लागायची आणि नंतर कोट घालून कार्यक्रमांना जावे लागत असे.” असा खुलासा त्यांनी केला आहे.
गुलशन ग्रोव्हर यांनी ‘बॅड मॅन’ नामक स्वतःचे आत्मचरित्र लिहले आहे. ज्यात त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीबद्दल भरभरून लिहले आहे. गुलशन मूळचे दिल्लीचे असून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरवात नाटकांपासून केली आहे. ८०च्या दशकात त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.