Jimmy Shergill Movies : अभिनयाची कौटुंबीक पार्श्वभूमी नसतानाही बॉलीवूडमध्ये नाव कमावणारे अनेक स्टार्स आहेत. यापैकी काहींनी तर आपल्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टरही दिले आहे. अशाच एका अभिनेत्याने १९९६ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अत्यंत देखणा हा अभिनेता आपल्या अभिनयाने निर्मात्यांचे व चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. त्याने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे केले. मधल्या काळात त्याचे चित्रपट फ्लॉपही झाले पण तो आताही कोटींमध्ये मानधन घेतो.

या अभिनेत्याचं नाव जिमी शेरगील आहे. पंजाबमधील दहशतवादावर आधारित गुलजार दिग्दर्शित ‘माचीस’ या चित्रपटातून जिमीने त्याच्या अभिनय करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि जिमीने इंडस्ट्रीतील आघाडीच्या निर्मात्यांचे लक्ष वेधून घेतले. जिमीला याच चित्रपटात आदित्य चोप्राने पाहिलं. त्याने तिला ‘मोहब्बतें’ चित्रपटात घेतलं. या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन असे तगडे कलाकार होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि जिमी रातोरात स्टार झाला. जिमी त्या काळी शाहरुख खानपेक्षाही देखणा दिसायचा असं म्हटलं जातं.

हेही वाचा – बॉलीवूड अभिनेता ३५ व्या वर्षी करणार अरेंज मॅरेज, मंदिरात बांधणार लग्नगाठ

‘मोहब्बतें’ चित्रपटानंतर जिमीच्या करिअरला गती मिळाली आणि त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्याने साकारलेल्या विविधांगी भूमिकांनी लक्ष वेधून घेतले आणि जिमीचा चाहता वर्ग वाढला. त्याने ‘मेरे यार की शादी है’, ‘दिल है तुम्हारा’, ‘हासील’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘यहाँ’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘एकलव्य: द रॉयल गार्ड’, ‘ए वेनस्डे!’, ‘माय नेम इज खान’, ‘तनु वेड्स मनू’, ‘साहेब बीवी और गँगस्टर’, ‘साहेब’, ‘बीवी और गँगस्टर रिटर्न्स’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’सह अनेक चित्रपटात काम केलं आहे.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्रीने अवघ्या २२ व्या वर्षी मुंबईत घेतलं हक्काचं घर, आई-वडिलांबरोबर केला गृहप्रवेश; फोटोंमध्ये दाखवली घराची झलक

जिमीने त्याच्या करिअरमध्ये अनेक सिनेमे केले आहेत. त्यापैकी काही चित्रपट सुपरहिट ठरले. बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, त्याचे काही चित्रपट गाजले असले तरी त्याने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत एकूण ५० फ्लॉप चित्रपट दिले आहेत. त्याने अनेक पंजाबी चित्रपटही केले आहेत. या पंजाबी चित्रपटांनीदेखील चांगली कामगिरी केली. तो पंजाबी सिनेमातील आघाडीचा स्टार आहे.

हेही वाचा – प्रियांका चोप्राच्या लेकीचं हिंदी ऐकलंत का? गोंडस मालतीने बाबाजवळ उच्चारला ‘तो’ शब्द, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिमी शेरगिल एका चित्रपटासाठी दोन कोटी रुपये घेतो. त्याच्याकडे एक आलिशान घर आहे आणि त्याची एकूण संपत्ती ७६.१४ कोटी रुपये आहे. जिमी शेवटचा वेब सीरिज ‘रणनीती: बालाकोट अँड बियाँड’मध्ये दिसला होता.