Manoj Bajpayee on Interfaith Marriage: मनोज बाजपेयी हे बॉलीवूडमधील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहेत. मनोज बाजपेयी त्यांच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. इतकेच नाही तर अभिनेत्री शबाना रझासोबतच्या आंतरधर्मीय विवाहामुळे मनोज अनेकदा चर्चेत असतात. मनोज बाजपेयी हिंदू आहेत, तर त्याची पत्नी शबाना रझा मुस्लीम आहे. दरम्यान, मनोज बाजपेयींनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाबाबत भाष्य केले आहे. आपल्या पत्नीच्या धर्माबाबतही त्यांनी आपले मत मांडले आहे.

हेही वाचा- लग्नानंतर सहा वर्षांनी आई झालेल्या बिपाशाने पहिल्यांदाच शेअर केले लेकीचे गोड फोटो, म्हणाली “देवी…”

मनोज बाजपेयी हिंदू ब्राह्मण कुटुंबातील आहेत, तर त्यांची पत्नी शबाना रझा मुस्लीम समाजातील आहे. अलीकडेच मनोज बाजपेयी यांनी पत्रकार बरखा दत्त यांना एक मुलाखत दिली. ज्यामध्ये ते त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल खुलेपणाने बोलले आहे. मनोज बाजपेयी म्हणाले की, “शबानाबरोबरची माझी साथ कोणत्याही धर्मापेक्षा खूप मोठी आहे. काही अनावश्यक गोष्टी सोडल्या, तर आम्ही एकमेकांसोबत खूप काही शेअर करतो. मी ब्राह्मण कुटुंबातील आहे, तर शबाना मुस्लीम कुटुंबातील आहे. पण माझ्या कुटुंबातील कोणालाही याचा त्रास नाही. मी अभिमानी हिंदू आहे आणि ती अभिमानी मुस्लीम आहे. अशा विषयांवर आमच्यात कधीही चर्चा झालेली नाही आणि होणारही नाही,” असे मनोज बाजपेयी म्हणाले.

हेही वाचा- Video: सुश्मिता सेन अन् तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल पुन्हा आले एकत्र? ‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘माझी पत्नी शबाना रझाच्या धर्माबाबत मला कोणी बोलले तर ते मी अजिबात सहन करणार नाही. मी या विषयावर गप्प बसू शकत नाही हे त्यांना कळायला हवे, त्यांना खूप काही ऐकायला मिळेल. माझ्या तोंडावर असे काही बोलण्याचे धाडस कोणात नसल्याचेही मनोज बाजपेयी म्हणाले.