अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी सध्या ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची निर्मिती कंगना रणौतने केली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीनने आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अवनीत कौरबरोबर किसिंग सीन दिला आहे, त्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे. अशातच आता नवाजुद्दीन सिद्दिकीने कंगनाच्या स्पष्ट स्वभावाविषयी भाष्य केलं आणि एक इच्छाही व्यक्त केली आहे.

कंगनाच्या स्वभावाविषयी बोलताना नवाजुद्दीन म्हणाला, “चित्रपटसृष्टीतील प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत कंगना अतिशय पारदर्शक आणि प्रामाणिक आहे. माझ्या मते, अनेकजण अशा गोष्टी बोलतात ज्या राजकीयदृष्ट्या योग्य आहे, पण तिच्याकडे खूप धैर्य आहे. असे खूप कमी लोक आहेत, जे बॉलिवूडमधील चुका, कमतरता या गोष्टी दुर्लक्ष करून पुढे जातात. पण बऱ्याच काळापासून न बोललेल्या विषयावर कंगना बोलते आणि ते विषय उत्तमरित्या मांडते.”

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री कोकणात जाऊन घडवतेय मडकी, ‘तो’ फोटो शेअर करीत म्हणाली “कळलंय आयुष्य मला…”

नवाजुद्दीनने कंगनाबरोबर एक निर्माती म्हणून काम केल्यानंतर लवकरच त्याला तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची इच्छा आहे. याविषयी नवाजुद्दीन म्हणाला की, “यापूर्वी कधी कंगनाबरोबर सहाय्यक कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली नाही. पण लवकरच कंगनाबरोबर काम करण्याची संधी मिळेल अशी आशा आहे. तिच्याबरोबर काम करताना लव्हस्टोरीवाला चित्रपट मिळावा, अशी माझी इच्छा आहे.”

आणखी वाचा – १७ वर्षांनंतर ‘नो-किस’ पॉलिसी तोडल्यावर तमन्ना विजय वर्माला म्हणाली, “ऑनस्क्रीन किस…”

View this post on Instagram

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘टिकू वेड्स शेरू’ हा चित्रपट २३ जून रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी व अवनीत कौर यांच्या मुख्य भूमिका आहेत.