बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता लवकरच ‘जवान’ या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो अलीकडेच अभिनेत्याने त्याला चित्रपटसृष्टीत ३१ वर्ष पूर्ण झाल्याने ‘आस्क एसआरके’ (#AskSRK)सेशन घेतले. या वेळी शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी काही प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना शाहरुखने भन्नाट उत्तरे दिली आहेत.

हेही वाचा : पत्नी कतरिना कैफच्या ‘या’ चित्रपटासाठी विकी कौशलने दिली होती ऑडिशन, पण निर्मात्यांनी…

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानला त्याच्या चाहत्याने ‘आस्क एसआरके’ सेक्शनमध्ये “वयाच्या ५७ व्या वर्षी तू चित्रपटात एवढे स्टंट कसे करतोस?” असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देत शाहरुख म्हणाला, “काय सांगू…भाई मला खूप पेनकिलर खायला लागतात” शाहरुखने दिलेले उत्तर पाहून अनेकांनी त्याला “आम्ही तुझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू” असा दिल्ला आहे.

हेही वाचा : “‘लस्ट स्टोरीज २’ कुटुंबाबरोबर बघा”, विजय वर्माचा सल्ला ऐकून नेटकरी भडकले; म्हणाले, “मनोरंजनाच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न…”

किंग खानचे अनेक चाहते सध्या त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘आस्क एसआरके’ सेक्शनमध्ये एका युजरने “जवानचा पुढचा टीझर केव्हा येणार?” असा प्रश्न विचारला. यावर शाहरुख म्हणाला, “सगळेजण चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. लवकरच आम्ही टीझर रिलीज करू…” मात्र, शाहरुखने टीझर केव्हा रिलीज होणार याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

हेही वाचा : “माझी ड्रॅगन क्वीन”, सई ताम्हणकरच्या वाढदिवशी बॉयफ्रेंड अनिश जोगने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा शाहरुखबरोबर प्रमुख भूमिका साकारणार आहे. जवान ७ सप्टेंबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे. ‘पठाण’नंतर या शाहरुखचे चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.