Suniel Shetty Talk About Son Ahan Shetty : बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी हा एक उत्तम अभिनेता असण्याबरोबरच एक उत्तम बापसुद्धा आहे. अनेकदा त्याने आपल्या मुलांबद्दल कठोर आणि खंबीर भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. जेव्हा जेव्हा त्याच्या मुलांना ट्रोल किंवा लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला गेलाय, त्या-त्या वेळी सुनील शेट्टीनं या टीकाकारांना स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.
काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टीने त्याचा मुलगा अहान शेट्टीला ‘बॉर्डर २’ हा चित्रपट साइन केल्यामुळे इतर काही चित्रपटांतून मुद्दाम काढून काढण्यात आलं असल्याचं म्हटलं होतं. यावेळी सुनील शेट्टी म्हणाला होता की, त्याचा मुलगा अहानला विनाकारण लक्ष्य केलं जातंय. इतकंच नाहीतर, अनेकांनी ‘बॉर्डर २’ मधल्या अहानच्या कास्टिंगवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
अशातच नुकत्याच एका मुलाखतीत सुनील शेट्टीला विचारण्यात आलं की, अहान तुमचा मुलगा असूनही त्याला चित्रपटांतून कसं काढून टाकलं गेलं? याबद्दल इन्स्टंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला, “माझी काही चूक असावी. त्यामुळे लोक माझ्यावर रागावले असतील आणि तो राग ते दुसऱ्यावर काढत असावेत. पण, तुमचं नशीब कुणी बदलू शकत नाही. अहान ‘बॉर्डर २’चा भाग आहे आणि त्यासाठी अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. वरुण धवन आणि दिलजीत दोसांझसारखे चांगले मित्र त्याला मिळाले.”
त्यानंतर तेव्हा सुनील शेट्टी म्हणतो, “कुठल्याही क्षेत्रात मेहनत ही करावीच लागते; शॉर्टकट्स नसतात. अहानचा पहिला चित्रपट कोविड काळात आला आणि त्याने ३५-४० कोटींची कमाई केली. त्यानंतर आता त्याचा ‘बॉर्डर २’ चित्रपट ५०० कोटी पार करेल, अशी मला आशा आहे आणि माझी देवाकडे अशी प्रार्थना आहे की, लोक सनी देओल, वरुण व दिलजीत यांच्यासह अहानचंही कौतुक करतील.”
सुनील शेट्टी इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, झूमबरोबरच्या जुन्या मुलाखतीत सुनील शेट्टीने सांगितले होते की, ‘बॉर्डर २’ साइन केल्यानंतर अहानला अनेक चित्रपटांमधून काढलं गेलं. त्याबद्दल तो असे म्हणाला होता, की, “अहाननं अनेक चांगल्या संधी सोडल्या. काही लोकांच्या अहंकारामुळे त्याला चित्रपटांतून काढून टाकलं गेलं. मग त्याच्यावर खोटे आरोप झाले. तो महागडे बॉडीगार्ड घेऊन फिरतो, असंही पसरवलं गेलं. त्याच्याबद्दल मुद्दाम पैसे देऊन काही बातम्या छापल्या गेल्या. हे सगळं केवळ यासाठी की, अहान ‘बॉर्डर’ करायला तयार होता. सगळं प्लॅन करून केलं गेलं होतं.”