“…म्हणून शाहरुखने शेवट बदलला” ‘मैं हूं ना’ चित्रपटातील क्लायमॅक्स सीनवरून सुनील शेट्टीचा खुलासा

सुनील शेट्टी नुकताच ‘धारावी बँक’ या वेबसीरिजमध्ये झळकला होता

sunil shetty 5
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हा कायमच चर्चेत असतो. उत्कृष्ट अभिनय आणि स्टंटबाजीच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीमध्ये आपलं भक्कम स्थान निर्माण केले. बॉलिवूडचा अण्णा म्हणून त्याला ओळखले जाते. आजवर त्याने चित्रपटांमध्ये अनेक अ‍ॅक्शन सीन्स दिले आहेत. कधी नायक तर कधी खलनायक बनून त्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. नुकताच त्याने शाहरुख खानबरोबरच्या एका अ‍ॅक्शन सीनबद्दलचा खुलासा केला आहे.

शाहरुख खानच्या ‘मैं हूं ना’ चित्रपटात सुनील शेट्टीने खलनायक साकारला होता. या चित्रपटाच्या शेवटी दोघांमध्ये एक अ‍ॅक्शन सीन चित्रित करण्यात आला. मात्र शाहरुखने त्यात बदल करण्यास सांगितले होते. बॉलिवूड बबलशी बोलताना सुनील शेट्टी असं म्हणाला, “मी मैं हूं ना त्याच्याबरोबर चित्रित केला. तो त्याच्या कलाकारांना सुपरस्टारसारखा वागवतो. शाहरुख हा मी पाहिलेला सर्वात सुरक्षित माणूस आहे. ‘मैं हूं ना’ च्या शेवटच्या सीनमध्ये त्याने माघार घेतली. त्याने सांगितले की मी सुनील शेट्टीला हरवू शकत नाही आपण चित्रपटाचा शेवट थोडा बदलूयात. जसे की तो बॉम्बची पिन काढतो. शारीरिकदृष्ट्या तो मला हरवू हरवू शकत नसल्याने असा बदल केला गेला. अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

“त्यांना काम आवडले पण…” वेबसीरिजसाठी नकार मिळाल्याने सुप्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

मैं हूं ना’ चित्रपटाच्या शेवटी सुनील शेट्टीने साकारलेले पात्र मृत्युमुखी पडते. या चित्रपटात दोन्ही अभिनेत्यांनी भारतीय सैनिकांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात बोमन इराणी, अमृता राव, सुश्मिता सेन यांसारख्या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता.

सुनील शेट्टी लवकरच ‘हंटर’ या वेबसीरिज मध्ये झळकणार आहे. बऱ्याच वर्षानंतर तो पुन्हा एकदा अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री ईशा देओलची झलक पाहायला मिळते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 19:04 IST
Next Story
“कोण तुम्ही? ३ महिन्याचं बाळ?” असिस्टंटवर अवलंबून राहणाऱ्या कलाकारांवर संतापल्या रत्ना पाठक; म्हणाल्या, “विमानातही यांना…”
Exit mobile version