सिनेसृष्टीत एकमेकांचे नातेवाईक असलेले बरेच कलाकार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री मधू हीदेखील बॉलीवूडमधील दोन दिग्गज अभिनेत्रींची नातेवाईक आहे. मधू ही हेमा मालिनी व जुही चावला यांची नातेवाईक आहे. या दोघींची नातेवाईक असल्यामुळे करिअरमध्ये यश मिळत नाही, असं मत मधूने व्यक्त केलं आहे. हेमा मालिनी यांच्याशी असलेल्या नात्यामुळे खूप आदर मिळाला आणि काही गोष्टी अगदी सहज उपलब्ध झाल्या, असं मधूला वाटतं. लवकरच मधू ‘कर्तम भुगतम’ मध्ये दिसणार आहे. यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने हेमा मालिनी व जुही यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.

‘झूम एंटरटेनमेंट’ला दिलेल्या मुलाखतीत मधू म्हणाली, “मी हेमाजी यांची चुलत बहीण आहे आणि जुही माझ्या जाऊबाई आहेत. त्यांनी माझ्या पतीच्या चुलत भावाशी लग्न केलं आहे. आमचं कुटुंब कलाकारांचं कुटुंब आहे. पण, जुहीजी कुटुंबातील सदस्य म्हणून माझ्या आयुष्यात खूप नंतर आल्या. माझं लग्न आधी झालं होतं आणि लग्न झाल्यावर मी इंडस्ट्री सोडली होती. त्यामुळे त्यांचा कुटुंबात असण्याचा माझ्यावर भावनिक, मानसिक किंवा शारीरिक काहीही परिणाम झाला नाही.”

अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटात होत्या तब्बल १५ अभिनेत्री, ३० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाने कमावले होते…

पुढे ती म्हणाली, “पण हेमाजींच्या कुटुंबातून आल्याचा माझ्यावर परिणाम झाला आणि तो चांगला होता. हेमाजींसारख्या दिग्गज अभिनेत्रीच्या कुटुंबातील व्यक्ती असल्याने मला खूप प्रतिष्ठा मिळाली.” मुंबईत अनेक महत्त्वाकांक्षी तरुणी अभिनेत्री व्हायचं स्वप्न उराशी बाळगून येतात, पण त्यांना इथं कटू अनुभवांना सामोरं जावं लागतं, अशी खंत मधुने व्यक्त केली. पण ती या गोष्टींपासून वाचली होती. कदाचित आपण हेमा मालिनींशी संबंधित असल्याने किंवा माझे वडील निर्माते असल्याने हे घडलं असावं असं मधूला वाटतं.

कृष्णा अभिषेकवर ‘या’ कारणाने नाराज आहे मामा गोविंदा; म्हणाला, “तो मुलाखतीत वारंवार म्हणतोय की…”

“त्यामुळे मला एक प्रकारची प्रतिष्ठा व आदर मिळाला. त्यांची नातेवाईक असल्याने मला एकही चित्रपट मिळाला नाही किंवा माझे सिनेमे हिट झाले नाही, त्यामुळे मला कौतुक किंवा दाद मिळाली, असंही नाही. पण त्यांची नातेवाईक असल्याने मला या इंडस्ट्रीत प्रवेश मिळाला आणि आदर मिळाला. मी कुणाच्या ऑफिसमध्ये गेले तर मला खूप आदराने वागवलं जायचं. इतका आदर मला मिळाला यामागचं कारण म्हणजे मी हेमाजींच्या कुटुंबातून आले आहे,” असं मधू म्हणाली.