सलमान खानसुद्धा एका मोठ्या काळानंतर बॉक्स ऑफिसवर कमबॅक करण्यास सज्ज आहे. २०१९ साली ‘दबंग ३’मध्ये सलमान दिसला. नंतर २०२१ मध्ये ‘अंतिम’मध्ये सलमान होता पण त्यात त्याची मुख्य भूमिका नव्हती. आता तब्बल ३ वर्षांनी सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. सलमानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर लोकांच्या पसंतीस पडला आहे तर गाणीदेखील सुपरहीट आहेत.

सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा टीझर शाहरुख खानच्या ‘पठाण’बरोबर प्रदर्शित झाला होता. आता ‘किसी का भाई किसी की जान’बरोबरही अशाच एका आगामी सुपरहीट चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. सर्वप्रथम या चित्रपटाबरोबर शाहरुख खानच्या ‘जवान’चा टीझर दाखवला जाणार होता, पण जवानचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झाल्याने त्याचा टीझर इतक्यात प्रदर्शित होणं कठीण आहे.

आणखी वाचा : गोविंदा व आमिर खानच्या ‘या’ चित्रपटातून तब्बूला दाखवलेला बाहेरचा रस्ता; अभिनेत्री म्हणाली, “हे सगळ्या…”

‘ऑल्वेज बॉलिवूड’ या सोशल मीडिया हॅंडलच्या वृतानुसार सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’बरोबर सनी देओलच्या ‘गदर २’चा टीझर प्रदर्शित होणार आहे. आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरुन त्यांनी ही माहिती दिली असून हा टीझर प्रचंड धमाकेदार असणार आहे शिवाय हा टीझर ५५ सेकंदाचा असणार आहे असं या हॅंडलवरुन स्पष्ट करण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान खान आणि सनी देओल यांची चांगली मैत्री असल्याने सलमानच्या चित्रपटादरम्यान हा टीझर प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ‘गदर २’मध्येही सनी देओल आणि अमीषा पटेल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. पहिला भाग दिग्दर्शित करणारे अनिल शर्माच याच्या दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे, तर ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट येत्या ईदला म्हणजेच २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.