बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. ती अनेकदा लोकांसमोर आपलं मत मांडताना दिसते. नुकतेच तिने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी लग्न केले आहे. स्वराने नुकतंच तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ आणि रजिस्टर लग्न केल्याचे काही दाखले शेअर करत हि गोड बातमी तिच्या चाहत्यांना दिली. दिलेल्या माहितीनुसार ६ जानेवारी २०२३ रोजी या दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केल्याचं समोर आलं आहे.

स्वराने इन्स्टाग्राम अकाउंटवरदेखील व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर सेलिब्रेटींच्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच तिच्या चाहत्यांनीदेखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री गौहर खानने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने कमेंटमध्ये लिहले आहे, “खूप खूप अभिनंदन स्वरा तुला भरपूर आनंद मिळो, तुझ्यामुळे मी खुश आहे.” दाक्षिणात्य अभिनेत्री पार्वतीनेदेखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत, तिने लिहले “दोघांचे खूप अभिनंदन.” सोनम कपूरने हार्टचे इमोजी कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे.

“तो मराठी बिग बॉसमधून आला म्हणून…” शिव ठाकरेबद्दल अर्चना गौतमचे स्पष्टीकरण

अभिनेत्री सयानी गुप्तानेदेखील शुभेच्छा दिल्या आहेत. ती असं म्हणाली,”वाह येयेये, तुम्हाला दोघांना शांती, सुख, हास्य आणि उत्तम वेळ मिळो. स्वरा तू यासाठी पात्र आहेस,” तसेच तिने तिच्या नवऱ्याचे स्वागत केले आहे. तसेच तिच्या लाखो चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे तसेच पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वराने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी स्वरा भास्कर एक आहे. ‘वीरे दी वेडिंग’, ‘बधाई हो २’, ‘तनु वेड्स मनू’ या चित्रपटांतून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. स्वराची तिच्या पतीशी एका आंदोलनात ओळख झाली. त्यानंतर दोघांच्यातमैत्री झाली आणि अखेर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.