मागील महिन्यात ‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशी हिचा इटलीमध्ये भीषण कार अपघात झाला होता. या कार अपघातात गायत्रीसह तिचा पती विकास ओबेरॉय जखमी झाला होता. तर समोरच्या गाडीमधील स्विस जोडप्याचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातानंतर पहिल्यांदाच गायत्री जोशी सगळ्यांसमोर आली. मंगळवारी मुंबईतील एका कार्यक्रमात गायत्री तिच्या पतीसह उपस्थित राहिली होती.

हेही वाचा – ‘या’ लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार स्पृहा जोशी, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

नुकतंच मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’चा लाँचिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूड कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित राहिली होते. याचवेळी अभिनेत्री गायत्री जोशी पती विकास ओबेरॉयसह पाहायला मिळाली. गायत्रीने स्टायलिश रफल्ड स्लीव्हजसह एक सुंदर पिवळा गाऊन परिधान केला होता. तर पती निळ्या रंगाच्या शार्प सूटमध्ये दिसला. सध्या दोघांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतं आहेत.

हेही वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टार वरुण तेज आज अडकणार लग्नाच्या बेडीत; हळदी समारंभाचे फोटो आले समोर

दरम्यान, भीषण कार अपघातानंतर गायत्रीने स्वतः ‘द फ्री प्रेस जर्नल’ला सांगितलं होतं की, “विकास व मी इटलीमध्ये आहे. आम्ही भीषण अपघाताचा शिकार झालो होतो. ईश्वराच्या कृपेने आम्ही दोघं सुखरुप आहोत.”

हेही वाचा – Video: “१८व्या वर्षी आली मुंबईत, जेवायला नव्हते पैसे अन् मग…”; अंकिता लोखंडेने सांगितला मुनव्वरला संघर्षाचा काळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गायत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती एक व्हिडीओ जॉकी आणि मॉडेल आहे. २००० साली फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा खिताब जिंकल्यानंतर तिच्या करिअरला सुरुवात झाली होती. त्यानंतर २००४ साली ती ‘स्वदेस’ चित्रपटात झळकली. शाहरुख खानबरोबर ती महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. मग २००५ साली गायत्रीने व्यावसायिक विकास ओबेरॉयशी लग्न केलं आणि तेव्हापासून ती अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.