सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करत आहे. अदा शर्माचा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. तर दुसरीकडे ‘द केरला स्टोरी’ प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक वाद सुरू आहे. काही लोक या चित्रपटाचे समर्थन करत आहेत, तर काही लोक हा अपप्रचार असल्याचे सांगत आहेत.

हेही वाचा- “महाराष्ट्रात जन्मलात, वाढलात तर मराठी…,” ‘द केरला स्टोरी’फेम अदा शर्माचं भाषेबद्दलचं वक्तव्य चर्चेत

पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर ही बंदी हटवण्यात आली आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर घालण्यात आलेल्या बंदीवर आता अभिनेत्री कंगना रनौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने चित्रपटावर घातलेली बंदी ‘असंवैधानिक’ असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने तिने पश्चिम बंगाल सरकारलाही फटकारलं आहे.

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार कंगना म्हणाली की, “सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने पारित केलेल्या चित्रपटावर बंदी घालणे म्हणजे संविधानाचा अपमान करण्यासारखे आहे. ‘द केरला स्टोरी’वर काही राज्यांनी घातलेली बंदी योग्य नाही. बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीविरोधात लोकांच्या तक्रारी असल्याचेही कंगनाने म्हटले आहे. त्यांना ज्या प्रकारचे चित्रपट पाहायचे आहेत, त्या प्रकारचे चित्रपट बनत नाहीत. ‘द केरला स्टोरी’सारखा चित्रपट बनला की लोकांच्या तक्रारी दूर होतात. लोकांना जे चित्रपट पाहायला आवडतात, त्याचा फायदा चित्रपटसृष्टीलाच होतो.”

हेही वाचा- Video : पापाराझींनी फोटोसाठी थांबवल्यावर अनुष्का शर्माने स्पष्टच सांगितले, म्हणाली, “बच्चा साथ में…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द केरला स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत २०७.४७ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवरून २५० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.