बॉलिवूडची धक धक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित, आजवर तिने अभिनयातून, नृत्यामधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आज सकाळी एक दुःखद बातमी अभिनेत्रीने दिली आहे. आज सकाळी तिच्या आईचे म्हणजे स्नेहलता दीक्षित यांचे निधन झाले आहे. त्यांनी आपल्या मुंबईतील घरात अखेरचा श्वास घेतला.

माधुरी दीक्षित तिच्या आईच्या खूपच जवळ होती. मागच्या वर्षी ९० व्या जन्मदिनानिमित्त माधुरी दीक्षितने पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच काही वर्षांपूर्वी ‘गुलाब गॅंग’ चित्रपटाच्या निमित्ताने एक कार्यक्रमात ती आईबद्दल भरभरून बोलली होती. एका पत्रकाराने प्रश्न विचारला की “तुझ्या आयुष्यातील अशी कोणती स्त्री आहे जिच्यामुळे तुझे आयुष्य बदलले?” त्यावर माधुरी दीक्षित म्हणाली, “नक्कीच माझी आई, कारण तिचे जेव्हा लग्न झाले तेव्हा ती गावातून मोठ्या शहरात आली. तेव्हा ती खूप लहान होती तिच्यासाठी हा मोठा बदल होता. इथे जेव्हा ती आली तेव्हा तिने एक मोठ्या शहराचा सामना केला.”

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
ms dhoni suresh raina
“मी तेव्हा धोनीला सांगितलं होतं”, चार वर्षांनंतर सुरेश रैनानं ‘त्या’ प्रसंगावर केला खुलासा; IPL २०२१ वरही केलं भाष्य!
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

“मला वाचव…” मृत्यूपूर्वी ‘हे’ होते सतीश कौशिक यांचे शेवटचे शब्द; लाडक्या लेकीचाही केला उल्लेख

आईबद्दल बोलताना माधुरी पुढे म्हणाली, “माझी आई शाकाहारी होती तर वडील मांसाहारी होते. तिने हा बदलदेखील स्वीकारला. तिने जेवण बनवण्यास सुरवात केली. तिच्या आयुष्यात जे बदल झाले ते तिने स्वीकारले ही खूप मोठी गोष्ट आहे. तसेच तिने शहरात येऊन शिक्षण घेतले. चार मुलं झाल्यानंतर तिने एमए केलं. चार मुलानंतर तिने या गोष्टी केल्या त्यासाठी मी तिला सलाम करते. त्यामुळे नक्कीच ती माझ्या आयुष्यातील एक आदर्श व्यक्ती आहे.” अशी प्रतिक्रिया तिने दिली होती.

‘गुलाब गॅंग’ चित्रपटात एक गाणेदेखील स्नेहलता यांनी एक गाणेदेखील लेकीबरोबर गायले होते. त्यांच्यावर दुपारी ३ वाजता वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.