बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांना ओळखले जाते. आजपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. अभिनयाबरोबरच त्या त्यांच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखल्या जातात. अभिनयाबरोबरच त्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतात. २००८ साली नीना गुप्ता यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्नगाठ बांधली. दरम्यान तब्बल १६ वर्षानंतर नीना गुप्ता यांनी आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे.
नीना गुप्ता यांनी आपल्या इनस्टाग्राम स्टोरीवर आपल्या लग्नातला फोटो शेअर केला आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्तीने नीना व विवेक मेहरा यांचे लग्न पार पडले. लग्नात नीना गुप्ता यांनी गुलाबी रंगाची साडी नेसली होती तर विवेक यांनी निळ्या जांभळ्या रंगाचा कुर्ता घातला परिधान केला होता. या लग्नात नीना गुप्ता यांची लेक मसाबाही हजर होती. फोटोमध्ये मसाबा हातात निळ्या रंगाची छत्री घेऊन नीना व विवेक यांच्या मागे उभी असल्याचे दिसून येते आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी माझ्या साध्या लग्नाचा फोटो असे कॅप्शन दिले आहे. नीना गुप्तांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

विवेक मेहरा यांच्याबरोबर लग्नगाठ बांधण्याअगोदर नीना गुप्ता वेस्टइंडीजचे क्रिकेटर विवयन रिचर्ड्स यांच्याबरोबर रिलेशनशीपमध्ये होत्या. या काळात नीना गुप्ता यांनी मसाबाला जन्म दिला. मसाबाच्या जन्मानंतर नीना व विवयन वेगळे झाले. त्यानंतर काही वर्षांनी एका प्रवासादरम्यान नीना गुप्ता यांची भेट विवेक मेहरा यांच्याबरोबर झाली. विवेक मेहरा दिल्लीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करत होते. हळू हळू दोघांमध्ये मैत्री वाढली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
हेही वाचा- आयरा खानचा सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल; नेटकरी म्हणाले, “किती निर्लज्जपणे…”
२००८ साली नीना गुप्ता कुटुंबातील एका विवाहसोहळ्यासाठी अमेरिकेला गेल्या होत्या. विवेक मेहरा यांनी अमेरिकेत जाऊन नीना गुप्ता यांना प्रपोज केले होते. नीना गुप्ता यांचा होकार मिळताच दोघांनी अमेरिकेतच लग्नगाठ बांधली. त्यावेळी नीना गुप्ता यांचे वय ४९ वर्ष होते.