scorecardresearch

परिणीतीने घेतला दिल्लीतील स्ट्रीट फूडचा आस्वाद; बरोबर असणाऱ्या व्यक्तीला पाहून चाहते म्हणाले…

राघव चड्ढांना डेट करण्याच्या अफवांदरम्यान, परिणीती दिल्लीत स्ट्रीट फूडचा आस्वाद घेताना दिसली. मोमोजचा आस्वाद घेताना अभिनेत्रीने तिचे फोटोही इन्स्टावर शेअर केले आहेत.

Parineeti chopra
परिणीतीने घेतला दिल्लीतील स्ट्रीट फूडचा आस्वाद

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. परिणीतीला आम आदमी पार्टीचे(आप) खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर स्पॉट करण्यात आलं होतं. त्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर परिणीती व राघव चड्ढा लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या व्हिडिओनंतर आता परिणीतीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती तिचा भाऊ सहज चोप्राबरोबर दिल्लीत स्ट्रीट फूड खाताना दिसत आहे. पण परिणीती दिल्लीत काय करत आहे? असा सवाल चाहते विचारत आहेत.

हेही वाचा- …म्हणून ‘बॉम्बे’ चित्रपटात काम न करण्याचा लोकांनी दिलेला सल्ला; मनीषा कोईराचा खुलासा

परिणीतीने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, परिणीती दिल्लीच्या रेस्टॉरंटमध्ये मोमोजचा आस्वाद घेताना दिसत आहे. परिणीतीबरोबर तिचा भाऊ सहज चोप्रा देखील दिल्लीच्या स्ट्रीट फूडचा आस्वाद घेताना दिसत आहे. फोटो पोस्ट करताना परिणीतीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सर्वोत्तम मानवांनी बनवलेले सर्वोत्कृष्ट अन्न! मोमो किंवा काही जीवन बदलणारी डाळ मखनी? होय कृपया… आत्ताच ऑर्डर करा, नंतर मला धन्यवाद द्या.”

हेही वाचा- आलिया भट्टने सोनम कपूरच्या लेकासाठी पाठवली खास भेट, फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

आप नेते राघव चड्ढा यांच्यासोबतच्या लग्नाच्या अफवांमुळे परिणीती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. परिणीती आणि राघव नुकतेच मुंबईतील लंच आणि डिनर डेटवर दिसले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याच्या अफवा पसरल्या. परिणीती अलीकडेच सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी देखील दिसली. त्यामुळे परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या लग्न करणाऱ असल्याची शक्यता वर्तवण्याव येत आहे. मात्र, दोघांनीही अद्याप आपल्या नात्याबद्दल कबुली दिलेली नाही.

परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. दोघांच्या नात्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांची बोलणीही सुरू असल्याची माहिती समोर आली होती. या दोघांच्या नात्यावर आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करून शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर आता प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता हार्डी संधूनेही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 15:47 IST

संबंधित बातम्या