प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की मुंबईत स्वतःचं घर असावं. बाल्कनीतून समुद्र किनारा दिसावा. त्यामुळे बरेच कलाकार समुद्र किनारी घर घेताना दिसत आहेत. हाच ट्रेंड फॉलो करत अभिनेत्री पूजा हेगडेनं देखील समुद्र किनारी आलिशान घर घेतल्याचं समोर आलं आहे. पूजाच हे आलिशान घर कुठे आहे? किती किंमत आहे? जाणून घ्या…

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्री पूजा हेडगेनं हृतिक रोशनसह ‘मोहनजोदडो’ चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. खूप कमी वेळात पूजाने बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीनं मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. इ-टाइम्सच्या वृत्तानुसार, पूजाने मुंबईतील वांद्रे येथे आलिशान घर घेतलं आहे.

हेही वाचा – अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…

पूजाच्या आलिशान घरातून समुद्र दिसतो. तिचं नवं घर ४ हजार स्क्वेअर फूटचं असल्याचं म्हटलं जात आहे. पूजाच्या या आलिशान घराची किंमत तब्बल ४५ कोटी रुपये आहे. लवकरच पूजा या नव्या घरात शिफ्ट होणार आहे.

हेही वाचा – ऑफिसमधून थकून आलेल्या सूनबाईसाठी प्रथमेश परबच्या आईने केला ‘हा’ खास पदार्थ, क्षितिजा फोटो शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटानंतर ती सुपरस्टार शाहिद कपूरसह झळकणार आहे. क्राइम थ्रिलर ‘देवा’ चित्रपटात पूजा व शाहिद ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे.