गेल्या काही महिन्यांपासून रामायणावर आधारित ‘रामायण’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी निश्चित झाला आहे. तर सीतेच्या भूमिकेसाठी जान्हवी कपूर व दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण अजूनपर्यंत सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री ठरलेली नाही. अशातच शूर्पणखाची भूमिका कोणती बॉलीवूड अभिनेत्री साकारणार हे समोर आलं आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात शूर्पणखाच्या भूमिकेसाठी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या नावाची चर्चा सुरू आहे. ‘पिंकविला’च्या वृत्तानुसार, रकुल प्रीत सिंग शूर्पणखाच्या भूमिकेत पाहायला मिळू शकते. याविषयी चित्रपट निर्मात्यांमध्ये चर्चा झाली आहे. पण निर्मात्यांनी स्वतः याबाबत अधिकृतरित्या घोषणा केली नाहीये. त्यामुळे रकुल प्रीत सिंग शूर्पणखाच्या भूमिकेत पाहायला मिळणार, या अधिकृत घोषणेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा – ‘या’ मराठी अभिनेत्याला वाटतंय मुंबई लोकलमध्ये हेडफोनची व्हावी सक्ती, म्हणाला…

माहितीनुसार, शूर्पणखा भूमिकेसाठी रकुलची टेस्ट पूर्ण झाली आहे. जर रकुलचं ही भूमिका साकारणार असल्याचं निश्चित झालं तर मग जॅकी भगनानीशी लग्न केल्यानंतरचा ‘रामायण’ हा तिचा पहिला चित्रपट असेल.

हेही वाचा – सई लोकूरच्या चिमुकल्या लेकीला सलील कुलकर्णी यांचं आवडतं ‘हे’ गाणं, स्वतः खुलासा करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग जॅकी भगनानीबरोबर २१ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. गोव्यात मोठ्या थाटामाटात दोघांचं लग्नसोहळा असणार आहे. पण हे आता कितपती खरं आहे? हे येत्या काळात समजेल.