Sushmita Sen And Rohman Shawl : बॉलीवूडमधील काही लोकप्रिय जोडप्यांमधील लोकप्रिय जोडपं म्हणजे सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल. सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. मात्र २०२१ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती.

“मैत्रीने सुरुवात केली आणि तीच मैत्री आजही टिकून आहे. नातं संपलंय… पण प्रेम अजूनही आहे!” असं म्हणत त्यांनी ब्रेकअपबद्दल सांगितलं होतं. दोघांनी ब्रेकअप जाहीर केलं असलं, तरी दोघे एकमेकांबरोबर अनेकदा दिसले आहेत. दोघेही अनेक प्रसंगी एकमेकांबरोबर आणि एकमेकांच्या कुटुंबाबरोबर दिसतात.

यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आजही संभ्रम कायम आहे. दोघं पुन्हा एकत्र येत आहेत का? अशा चर्चा अनेकदा सोशल मीडियार होताना दिसतात. तसंच अनेक चाहते दोघे पुन्हा एकत्र यावेत अशी इच्छाही व्यक्त करताना दिसतात. अशातच रोहमनने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

सुष्मिता सेनबरोबरच्या मैत्रीला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रोहमनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये त्याच्या मिठीतील मुलीचा चेहरा दिसत नाहीय. पण या पोस्टखालील कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तसंच त्याने या पोस्टमध्ये सुष्मिताला टॅगही केलं आहे.

कॅप्शनमध्ये रोहमन असं म्हणतो, “सात वर्षे पूर्ण! काही गोष्टी त्यांच्या नावांपेक्षा मोठ्या होतात, पण त्याचा अर्थ कधीच हरवत नाही. मी तुला बुद्धिबळ शिकवलं आणि आता तू मला बिनदिक्कत हरवतेस. तू मला पोहायला शिकवलंस, पण पाण्याला घाबरणाऱ्या एका माणसाला तू खोल पाण्यात उतरवलंस (शब्दशः आणि भावनिकदृष्ट्या सुद्धा)”

यापुढे तो म्हणतो, “आपण एकमेकांबरोबर आपली भीती, ताकद आणि सगळंच वाटून घेतलं. या सगळ्यातून एक असं नातं तयार झालं, जे कोणत्याच लेबलमध्ये बसत नाही. एकेकाळी तू माझं सुरक्षित स्थान होतीस आणि अजूनही आहेस. आपल्यामधलं हे प्रेम आणि टिकून राहिलेली मैत्री – यासाठी मी मनापासून आभारी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ETimes शी झालेल्या एका खास गप्पांमध्ये, जेव्हा रोहमनला विचारण्यात आलं होतं की लोक त्याला ‘सुष्मिता सेनचा बॉयफ्रेंड’ म्हणतात याबदलद त्याला काय वाटतं? यावर त्याने उत्तर देत, “लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. मी स्वतःशी प्रामाणिक असेन, तर लोक काय बोलतात किंवा करतात याचा त्रास मला होणार नाही.” असं म्हटलं होतं.