प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिल्ली उच्च न्यायालयाची माफी मागितली आहे. भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर केल्याप्रकरणी विवेक अग्निहोत्रींनी तत्कालीन न्यायाधीश एस मुरलीधर यांच्यावर टीका केली होती.

न्यायाधीश एस मुरलीधर यांच्यावर पक्षपात केल्याचा आरोप विवेक अग्निहोत्रींनी केला होता. २०१८ मधील या प्रकरणानंतर न्यायालयाने अग्निहोत्रींविरोधात खटला दाखल केला होता. न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका अग्निहोत्रींवर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी विवेक अग्निहोत्रींना आज ( १० एप्रिल ) प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश बजावण्यात आले होते. त्यानुसार दिल्लीत उच्च न्यायालयात हजर राहत विवेक अग्निहोत्रींनी माफी मागितली आहे.

हेही वाचा>> “मी मामावर खूप प्रेम करतो, पण…” गोविंदाबरोबरच्या वादावर कृष्णा अभिषेकची प्रतिक्रिया, म्हणाला…

माफी मागितल्यानंतर विवेक अग्निहोत्रींची दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. “तुमच्या मनात न्यायालयाप्रती आदर आहे. तुम्ही जाणून बुजून न्यायालयाचा अवमान केलेला नाही, त्यामुळे तुमच्या विरोधात जारी केलेली नोटीस मागे घेत आहोत. सर्व आरोपांतून तुमची मुक्तता करण्यात येत आहे,” असं न्यायालयाने म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ मेला होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय?

२०१८मध्ये झालेल्या भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर केल्याप्रकरणी विवेक अग्निहोत्रींनी तत्कालीन न्यायाधीश एस मुरलीधर यांच्याबाबत ट्वीट केलं होतं. या ट्वीटमधून अग्निहोत्रींनी न्यायाधीशांवर पक्षपात केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अग्निहोत्रींनी हे ट्वीट डिलीट केलं होतं. याप्रकरणी त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.