बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून तिच्या ड्रामा पेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींची अधिक चर्चा आहे. ती अनेक गंभीर आरोपांच्या जाळ्यात अडकली आहे. पण अशातच तिचा पती आदिल खानच्या घरी जाताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती जेसीबीवरून आदिलच्या घरी जाताना दिसली होती. त्यानंतर आता राखीचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यामध्ये राखी पापाराझींवर भडकल्याचं दिसत आहे.

हेही वाचा – एका शब्दामुळे गौरव मोरेला अडवलं होतं विमानतळावर; पार्थ भालेरावने सांगितला ‘तो’ किस्सा

राखी सावंतचा हा व्हायरल व्हिडीओ ‘फिल्मी ग्यान’ या एंटरटेन्मेंट इन्स्टाग्रामच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी पापाराझींना म्हणते की, “तुम्ही माझ्या वरातीमध्ये आला आहात का? शूट का करताय?” त्यानंतर ती एकाचा मोबाइल घ्यायला जाते आणि मग ती काही वेळानंतर तिथून पळ काढते.

हेही वाचा – “आज अचानक पॅकअप नंतर…” प्रसाद ओक याला चाहत्यांनी दिला आश्चर्याचा धक्का, अनुभव सांगत म्हणाला…

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी मालिकेच्या सेटवर २ ते ४ काय करते? पाहा…

राखी हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, ‘हा राग नसून ती वेडी झाली आहे.’ तर दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, ‘आता तिला वेड्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे.’ तर तिसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, ‘मला असं वाटतं की, ही हळूहळू पागल होत चालली आहे.’ चौथ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, ‘आता ही वेडेपणाच्या शेवटच्या पातळीवर पोहोचली आहे. ही अशी पातळी आहे, जिथे वेडेपणा हिंसक होतो.’

हेही वाचा – “मी त्याच्यावर खूप प्रेम करते” अभिनेत्री केतकी माटेगावकरचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वा राखीने आपल्या जीवनावर आधारित चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती. या चित्रपटासाठी अभिनेत्री आलिया भट्ट आणि विद्या बालनला विचारलं असल्याच देखील तिनं सांगितलं होतं.