२२ मार्चला चित्रपटगृहात दोन वेगवेगळ्या जोनरचे चित्रपट प्रदर्शित झाले. एक म्हणजे स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित असलेला रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर दुसरा कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगांव एक्सप्रेस’ प्रेक्षकांचा भेटीस आला. सध्या या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर चुरस पाहायला मिळत आहे. ‘मडगांव एक्सप्रेस’ ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटापेक्षा अधिक कमाई करताना दिसत आहे.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात वीर सावरकरांची भूमिका रणदीप हुड्डाने साकारली आहे. तर अंकिता लोखंडे वीर सावरकरांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात करेल अशी सगळ्यांना अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. पहिल्याच दिवशी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाने १ कोटींची कमाई केली. त्यामुळे वीकेंडला कमाईत वाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही.

हेही वाचा – ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात प्रशांत दामले झळकणार होते ‘या’ भूमिकेत, पण…; जयवंत वाडकरांनी सांगितला किस्सा

सॅकनिल्क अर्ली ट्रेडच्या माहितीनुसार, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शनिवारी २.२५ कोटींचा गल्ला जमावला. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ३.३० कोटींचा व्यवसाय केला आहे. तर कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगांव एक्सप्रेस’बद्दल बोलायचं झालं, या चित्रपटाने पहिल्या दिवशी दीड कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी कमाईत थोडी वाढ पाहायला मिळाली.

हेही वाचा – मुग्धा वैशंपायनला ‘काकू’ म्हणणाऱ्या युजरला प्रथमेश लघाटेने दिलं चोख उत्तर, म्हणाला, “माकड म्हणतं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अविनाश तिवारी, दिव्येंदु आणि प्रतीक गांधी अभिनीत ‘मडगांव एक्सप्रेस’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ३ कोटी कमावले. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या तुलनेत ‘मडगांव एक्सप्रेस’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. आतापर्यंत ‘मडगांव एक्सप्रेस’ने एकूण ४.५० कोटींची कमाई केली आहे.