scorecardresearch

“त्याने तिहार जेलमध्ये मला फसवून आणलं अन्…” चाहत खन्नाचा कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरबद्दल धक्कादायक खुलासा

तिला तिहार जेलमध्ये फसवून आणलं गेलं तेव्हा ती चांगलीच घाबरली होती

chahatt khanna sukesh
फोटो : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि इतर काही अभिनेत्रींना गंडा घालणाऱ्या कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरबद्दल सध्या बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. केवळ जॅकलिन आणि नोरा फतेहीच नव्हे तर इतरही काही अभिनेत्रींची नावं यात प्रमुख्याने समोर आली आहेत. यामध्ये चाहत खन्ना, निक्की तांबोळी, सोफिया सिंह या अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. नुकतंच ३ जानेवारीला जॅकलिनसह चाहत खन्नानेसुद्धा पटियाला कोर्टात या केससंदर्भात जबाब नोंदवला होता.

सुकेशने आपल्याला कसं फसवलं याविषयी नुकतंच अभिनेत्री चाहत खन्नाने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. ‘ई-टाइम्स’बरोबर संवाद साधताना चाहत खन्नाने सुकेशने तिला बरंच ब्लॅकमेल केल्याचंही स्पष्ट केलं. चाहत खन्नाला एके दिवशी एका शाळेतील कार्यक्रमाचं आमंत्रण देऊन तिला तिहार जेलमध्ये नेल्याचाही तिने या मुलाखतीत खुलासा केला आहे. तिला तिहार जेलमध्ये फसवून आणलं गेलं होतं. तेव्हा ती चांगलीच घाबरली होती, तिला तिच्या दोन मुलांची खूप काळजी वाटत होती.

आणखी वाचा : ‘पठाण’चे गुणगान गाणाऱ्या बॉलिवूडवर कंगना रणौत भडकली; ट्वीटमध्ये म्हणाली, “राजकारणापासून…”

चाहत म्हणाली, “मला आठवतं की जेलची खोली लॅपटॉप, महागडी घड्याळं आणि इतर मौल्यवान वस्तूंनी पूर्णपणे भरलेली होती. याबरोबरच तिथे बऱ्याच ब्रॅंडेड बॅग्ससुद्धा होत्या. टया छोट्याशा खोलीत सोफा, एसी, खुर्ची, फ्रीज अशा सगळ्या सुखसोयी होत्या.” सुकेशच्या भेटीबद्दल चाहत म्हणाली, “तो जेव्हा मला भेटला तेव्हा त्याने कबूल केलं की तो माझा खूप मोठा चाहता आहे, माझी मालिका तो आवर्जून पाहतो. मला या जेलमध्ये का आणलं आहे असा प्रश्न जेव्हा मी केला तेव्हा अचानक तो खाली वाकला आणि गुढग्यावर बसला आणि त्याने मला लग्नासाठी प्रपोज केलं. मी ओरडून त्याला माझं लग्न झालं असून मला २ मुलं असल्याचं सांगितलं. त्यावर त्याने माझा पती माझ्यासाठी योग्य नसल्याचं सांगितलं आणि माझ्या मुलांसाठी तोच योग्य पिता असल्याचाही त्याने दावा केला. मी हे सगळं पाहून मला तिथे रडूच कोसळलं.”

सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. सध्या तो तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. जॅकलिन, नोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींना त्याने महागड्या भेटवस्तू देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढले होते. सुकेशने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांच्यासह अनेकांची फसवणूक केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 12:17 IST