बॉलीवूडमध्ये १९९३ मध्ये म्हणजेच बरोबर ३१ वर्षांपूर्वी ‘खलनायक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील माधुरी दीक्षितवर चित्रित करण्यात आलेल्या ‘चोली के पीछे क्या है…’ या आयकॉनिक गाण्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. अलका याग्निक आणि ईला अरुण यांनी गायलेलं हे गाणं आजही लोकप्रिय आहे परंतु, या गाण्यावरुन त्या काळात खूप वादही झाला होता. आता २०२४ मध्ये ‘चोली के पीछे क्या है…’ या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पण, यावेळी माधुरीच्या जागी या गाण्यावर बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान अर्थात बेबो थिरकताना दिसणार आहे.

बॉलीवूडमध्ये सध्या रिमिक्स गाण्यांचा ट्रेंड चालू आहे. अशातच माधुरीच्या आयकॉनिक गाण्याचं रिमिक्स व्हर्जन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात करीना कपूर खानचा गुलाबी साडीतील ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. रिमिक्स व्हर्जनला दिलजीत दोसांझ, आईपी सिंग, अल्का याग्निक व ईला अरुण यांचा आवाज देण्यात आला आहे. अर्थात गाण्याच्या मूळ रुपांतरात जास्त बदल न करता प्रेक्षकांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न संगीतकारांनी केला आहे.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting about Hardik Pandya in T20 WC
Hardik Pandya: रोहित, द्रविड, अजित आगरकर यांची BCCI मुख्यालयात दोन तास बैठक; हार्दिक पांड्याबाबत सविस्तर चर्चा, नेमकं ठरलं काय?
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा

हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत झळकली प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण; फोटो शेअर करत म्हणाला, “तू पहिल्यांदा टीव्हीवर…”

‘चोली के पीछे क्या है…’ या मूळ गाण्याबद्दल सांगायचं झालं तर, १९९३ मध्ये रिलीज झालेल्या ‘खलनायक’ चित्रपटातील हे गाणं आहे. या ॲक्शन क्राईमपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सुभाष घई यांनी केलं होतं. या चित्रपटात संजय दत्तने खलनायकाची भूमिका साकारली होती. याशिवाय माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते.

हेही वाचा : “लोक म्हणतात ही जोकर आहे”, सारा अली खानने ट्रोलिंगवर केलं भाष्य; म्हणाली, “मला मूर्ख, चुकीचं…”

दरम्यान, करीना कपूर खानच्या आगामी ‘क्रू’ चित्रपटात ‘चोली के पीछे क्या है…’ या गाण्याचं नवीन व्हर्जन प्रेक्षकांना ऐकायला मिळेल. बेबोशिवाय ‘क्रू’ या चित्रपटात तब्बू, क्रिती सेनॉन, दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याचं दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केलं आहे. येत्या २९ मार्च २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.