अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना हसवणारा कपिल शर्मा त्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’चे नवे पर्व सध्या सुरु आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. सगळ्यांना खळाळून हसायला लावणारा कपिल शर्मा आता ‘ज्विगाटो’ चित्रपटातून एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेबद्दल त्याने खुलासा केला आहे.

२०१३ मध्ये आलेल्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या कार्यक्रमामुळे त्याची लोकप्रियता वाढत गेली. या काळात त्याने काही विनोदी चित्रपटदेखील केले. मात्र आता तो ‘ज्विगाटो चित्रपटातून एका डिलीव्हरी बॉयचे पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात तो असं म्हणाला, “मी नंदिता दासचा चाहता आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या कामाने प्रभावित होता तेव्हा तुम्ही त्या माणसावर विश्वास ठेवता. त्यांच्याकडे ठरविक काम असते. हे म्हणजे एकाच वर्षी दोन तीन चित्रपट करण्यासारखे नाही.”

Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD
‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Love Sex Aur Dhokha 2 to feature trans woman Bonita Rajpurohit
एकेकाळी १० हजार रुपये महिन्याने करायची काम, आता ट्रान्सवूमन बोनिता एकता कपूरच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

चित्रपटांच्या अपयशावर अक्षयनंतर सारा अली खानने केलं भाष्य; म्हणाली, “चुका या वयात…”

तो पुढे म्हणाला, “तिचा जो काही विचार होता तो चांगलाच होता. माझ्यासाठी एक मोठी संधी होती कारण लोक मला गंभीरपणे घेत नाहीत. माझी बायको माझे वडीलदेखील मला गंभीर समजत नाहीत.जेव्हा तिने मला कथा ऐकवली तेव्हा मी म्हणालो मी का? त्यावर ती म्हणाली, या चित्रपटासाठी शाहरुखने जरी होकार दिला असता तरी त्याला मी घेतले नसते. तुझा चेहरा सामान्य व्यक्तीसारखा आहे मला माझे मात्र त्यात सापडले म्हणून मी तुला विचारले.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दासने केले असून कपिल शर्माच्याबरोबरीने गुल पनाग, सयानी गुप्ता हे कलाकारदेखील आहेत.हा चित्रपट बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे.