Crew box office collection day 1: तब्बू, करीना कपूर व क्रिती सेनॉन या अभिनेत्री मुख्य भूमिकेत असलेला ‘क्रू’ चित्रपट शुक्रवारी (२९ मार्च रोजी) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने ग्रँड ओपनिंग केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. हा २०२४ मधील सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

प्रेक्षक ‘क्रू’ चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. कारण रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाची खूप चर्चा होती. आधी चित्रपटाचा मनोरंज टीझर आला, त्यानंतर ट्रेलरने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच करीना, तब्बू व क्रिती एकत्र आल्या आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

प्रियांका चोप्रा पती निक जोनससह पोहोचली बहिणीच्या वाढदिवसाला, ग्लॅमरस लूकने वेधलं लक्ष, पाहा व्हिडीओ

‘सॅकनिल्क’ च्या वृत्तानुसार, ‘क्रू’ने पहिल्या दिवशी भारतात ८.७५ कोटी रुपये कमावले आहेत. तर जगभरात या चित्रपटाने २०.०७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शुक्रवार असूनही चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. वीकेंडला या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Video: गर्दीतून ‘नमस्कार वहिनी’ अशी हाक येताच आलिया भट्टने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘क्रू’ चे दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केले आहे आणि त्यात कपिल शर्मा, दिलजीत दोसांझ, सास्वता चॅटर्जी आणि राजेश शर्मा यांच्याही भूमिका आहेत. हा विनोदी चित्रपट पहिल्या दिवशी चांगली कमाई करण्यात यश्वी ठरला आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या ‘शैतान’शी टक्कर होत आहे. पण या चित्रपटाला तीन आठवडे झाले आहेत. याशिवाय दुसरा कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, त्याचा फायदा या चित्रपटाला मिळू शकतो.