‘पठाण’ चित्रपटापासून अभिनेत्री दीपिका पदुकोण चांगलीच चर्चेत आहे. केवळ बॉलीवूड चित्रपटांमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येसुद्धा दीपिकाने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावर झळकली होती. टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवणारी दीपिका सहावी भारतीय सेलिब्रिटी ठरली आहे. यापूर्वी परवीन बाबी, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, आमिर खान आणि शाहरुख खान या कलाकारांनी या कव्हर पेजवर स्थान मिळवले आहे.

हेही वाचा : बॉलीवूडचा कोणता सेलिब्रिटी रणबीरच्या लेकीला चांगलं सांभाळेल? अभिनेता म्हणाला, “हा सुपरस्टार राहासाठी परफेक्ट…”

टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवल्यावर दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील नावात मोठा बदल केला आहे. अभिनेत्रीने आपले नाव ‘दीपिका पादुकोण’ असे हिंदीमध्ये लिहिले आहे. यापूर्वी दीपिकाच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये इंग्रजीत नाव दिसायचे, परंतु अलीकडेच स्वत:चे नाव हिंदीमध्ये अपडेट करीत तिने मोठा बदल केला आहे.

हेही वाचा : स्वत:ची समजून अनोळखी व्यक्तीच्या गाडीत बसणार होती शहनाझ गिल, इतक्यात… अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

टाइम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली होती, “माझ्या देशाचा जगभरात प्रभाव पाडणे हे माझे ध्येय आहे. भारतीय सिनेमा एवढ्या दूरवर पोहोचला आहे की, तुम्हाला कुठेही गेलात तरी प्रसिद्धी मिळते. भारताची नवी पिढीसुद्धा स्वत:ला सिद्ध करताना मला दिसत आहे.” ग्लोबल स्टार झाल्यावर अनेक कलाकार वेस्टर्न कल्चरशी जुळवून घेत तेथील संस्कृतीला आपलेसे करतात, परंतु अभिनेत्री दीपिका पदुकोण याला अपवाद ठरली आहे. अभिनेत्री खऱ्या अर्थाने भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याने तिने हिंदीमध्ये नाव अपडेट केले आहे असे तिच्या अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : चेन्नईत डोसा खाताना अभिनेत्री सारा अली खानला येतेय ‘या’ दोन व्यक्तींची आठवण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२३ मध्ये दीपिका शाहरुखबरोबर ‘पठाण’ चित्रपटात झळकली होती. ‘पठाण’ने जगभरात १०५० हून अधिक कोटींची कमाई केली. आता दीपिका ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘फायटर’ या तिच्या आगामी चित्रपटांसाठी तयारी करीत आहे.