आनंद एल राय दिग्दर्शित ‘रांझना’ या चित्रपटाला आज १० वर्षे पूर्ण झाली. ‘रांझना’ मध्ये धनुष, अभय देओल, सोनम कपूर, स्वरा भास्कर, झीशान अय्युब या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाल्यावरही रांझनाची क्रेझ लोकांच्या मनात अजूनही कायम आहे.

‘रांझना’ चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिग्दर्शक आनंद एल राय यांनी रांझनाच्या सिक्वेलची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. दिग्दर्शकाने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला ‘रांझना’मधील कुंदनची आठवण येईल. हा ‘रांझना’चा सिक्वेल असल्याचे अभिनेता धनुषचे संवाद आणि चित्रपटाचे संगीत ऐकून कळते.

हेही वाचा : ‘भूल भुलैय्या २’ ते ‘सत्यप्रेम की कथा’ कार्तिक-कियाराच्या मैत्रीत असा झाला बदल; अभिनेत्री म्हणाली, “आधी त्याला खूप ओरडायचे अन् आता…”

‘रांझना’च्या या सिक्वेलचे नाव ‘तेरे इश्क में’ असे असून टीझरमध्ये धनुषच्या एका हातात दारूची बाटली, दुसऱ्या हातात सिगारेट पाहायला मिळायला आहे. टीझरमध्ये असलेल्या अभिनेता धनुषच्या संवादाने संपूर्ण लक्ष वेधून घेतले आहे. धनुष म्हणतो, “मागच्या वेळी कुंदन होता त्याने सर्व मान्य केले, पण यावेळी तू शंकरला कसे थांबवणार? ” हा संवाद ऐकून ‘तेरे इश्क में’ हा रांझनाचा सिक्वेल असल्याचे स्पष्ट होते. ‘रांझना’मध्ये अभिनेता धनुषने ‘कुंदन’ची भूमिका साकारली होती, तर आता ‘तेरे इश्क में’ चित्रपटात धनुष ‘शंकर’ हे पात्र साकारणार आहे.

हेही वाचा : “जलेगी तेरे बाप की…” ‘आदिपुरुष’ मधील ‘ते’ वादग्रस्त संवाद अखेर बदलले; आता चित्रपटात हनुमानजी बोलणार…

‘तेरे इश्क में’ चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. चित्रपटाचा टीझर शेअर करताना दिग्दर्शक आनंद एल राय म्हणतात, “काही कथा या जुन्या मित्रासारख्या भेटतात, तो मित्र आपल्याला हात न मिळवता थेट मिठी मारतो…१० वर्षांपूर्वी अशी एक कथा मला सापडली होती. कुंदन माझा मित्र होता, पण जगू शकला नाही. तो जगण्याच्या मनस्थितीत नव्हता! आता १० वर्षांनंतर अशीच एक दुसरी गोष्ट आहे, कुंदन आणि हा मुलगा एकच आहे फक्त याचे विचार काहीसे वेगळे आहेत. ‘तेरे इश्क में’ प्रेक्षकांनो खास तुमच्यासाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चित्रपटाचा टीझर पाहून चाहते धनुषचा रागीष्ट लुक पाहून हैराण झाले आहेत. एका युजरने धनुष, आनंद एल आर राय, ए आर रहेमानचे संगीत नक्कीच हा चित्रपट सुपरहिट होणार अशी कमेंट केली आहे.