बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते म्हणून धर्मेंद्र यांना ओळखले जाते. ७० च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. आतापर्यंत त्यांनी तब्बल ३०० चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. वयाच्या ८८ व्या वर्षातही ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. सोशल मीडियावर धर्मेंद्र मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान, त्यांच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

धर्मेंद्र यांनी त्यांच्या ट्विटर एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या एका जुन्या चित्रपटातील सीनचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोबरोबरच त्याला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटोबरोबर त्यांनी लिहिले, ‘अच्छा तो हम चलते हैं।’, धर्मेंद्र यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अभिनेत्याची ही पोस्ट बघून चाहते चिंतेत पडले आहेत. या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केली आहे. एकाने लिहिले, “धरमजी, तुम्हाला वाटते का की आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देऊ, आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही.” तर अनेकांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत चिंताही व्यक्त केली आहे.

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत
ED and CBI have been the operatives of Narendra Modi in the country for the last 10 years says nana patole
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”
Criticism of Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Mahavikas Aghadi in bhandara
“उद्धव ठाकरेंचा आम्ही खूप वर्षे अनुभव घेतला, आता काँग्रेसला त्यांच्यासोबत…” देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले…

काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये त्यांच्या हातात जेवणाचे ताट होते. चेहरा सुकलेला व त्यांच्या पायाला फॅक्चर असल्याचेही दिसून आले होते. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले होते, “आर्धी रात्र झालीयं, झोप येत नाहीय, भूक लागली आहे. मित्रांनो शिळी पोळी तुपाबरोबर खूप छान लागते.” पहाटे ४ वाजता धर्मेंद्र यांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट करत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती.

हेही वाचा- “५० लाख डॉलर्स दिले तरी मी येणार नाही,” जेव्हा दिवंगत लता मंगेशकर यांनी लग्नात गाण्यास दिला होता नकार

धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ते गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांच्याबरोबर आलिया भट्ट, रणवीर सिंग, शबाना आझमी व जया बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांचा तेरी बातो मैं ऐसा उलझा जिया चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांच्याबरोबर शाहीद कपूर व क्रिती सेनॉनची प्रमुख भूमिका होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.