धर्मेंद्र यांनी गेल्या ५ दशकात एकाहून एक सरस असे चित्रपट दिले आहेत. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांच्याबरोबरीनेच एक काळ धर्मेंद्र यांनी गाजवला आहे. आज या वयातही त्यांची अभिनयाबद्दलची ओढ कायम आहे. नुकतंच धर्मेंद्र करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकले. या चित्रपटात त्यांची आणि शबाना आजमी यांची केमिस्ट्री लोकांना प्रचंड आवडली.

चित्रपटक्षेत्रात एवढं मोठं योगदान देऊनही धर्मेंद्र यांना एका गोष्टीची खंत वाटते आणि नुकतीच त्यांनी ही खंत व्यक्त केल्याचं समोर आलं आहे. इतकी वर्षं इंडस्ट्रीत काम करूनही त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना अद्याप मिळालेली नाही किंवा त्यांच्या कुटुंबालाही याचं श्रेय मिळालेलं नसल्याचं धर्मेद्र यांनी बोलून दाखवलं आहे. आज धर्मेंद्र यांची दोन्ही मुलं एकाहून एक असे सरस चित्रपट देत आहेत तरी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला योग्य मान इंडस्ट्रीत मिळत नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : सीमा हैदर आणि सचिनची प्रेमकहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर; ‘कराची टू नोएडा’चे पोस्टर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टाईम्स नाऊ’शी संवाद साधताना धर्मेंद्र म्हणाले, “आमचे कुटुंब मार्केटिंगच्या विरोधात आहे. आम्हाला स्वतःला विकायची गरज नाही आमचं कामच यासाठी पुरेसं आहे. माझ्या कुटुंबासाठी चाहत्यांचं प्रेमच सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. या चित्रपटसृष्टीने आमची दखल घेतली नाही तरी आम्हाला काही फरक पडत नाही.” सनी देओल आणि बॉबी देओल यांनी कित्येक सुपरहीट चित्रपट देऊनसुद्धा त्यांची या इंडस्ट्रीने कदर केली नाही असंही धर्मेंद्र म्हणाले.

इतकंच नव्हे तर धर्मेंद्र यांच्या १९६९ मध्ये आलेल्या ‘सत्यकाम’ या चित्रपटाचीसुद्धा या इंडस्ट्रीने दखल घेतली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. धर्मेद्र यांचा मुलगा सनी देओल सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सनी देओलच्या ‘गदर २’ या चित्रपटाने ८ दिवसांत ३०० कोटींची कमाई करत नवा विक्रम रचला आहे.