दिवंगत दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानमधील घराच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पेशावरमधील किस्सा खवानी बाजारातील दिलीप कुमार यांचं वडिलोपार्जित घर आहे, या घराचं नूतनीकरण केलं जात आहे.

पेशावरमधील एका स्रोताच्या हवाल्याने ‘इ-टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार “दिलीप कुमार यांचे घर आता खैबर पख्तूनख्वा सरकारच्या मालकीचे आहे. पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या या घराचं पुन्हा नूतनीकरण केलं जात आहे.” काम संपल्यानंतर दिलीप कुमार यांच्या या घराचे संग्रहालयात रूपांतर केले जाईल, पण ते होण्यास थोडा वेळ लागेल, कारण त्यासाठी निधीची गरज आहे. संबंधित विभाग सध्या पुढील कामांसाठी निधीची वाट पाहत आहे. हा निधी पाकिस्तानमधील नवीन सरकारच्या स्थापनेनंतर मिळेल, असं म्हटलं जातंय.

“…यात अभिमान कसला? शरम वाटली पाहिजे,” किरण मानेंचा रोख फडणवीसांकडे? म्हणाले, “फोडून आणलेल्या खजिन्यातल्या…”

दिलीप कुमार यांच्या घराव्यतिरिक्त राज कपूर यांचे वडिलोपार्जित घरही सरकारी मालकीचे असून त्याचंही संग्रहालयात बनवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्त ‘इ-टाइम्स’ने दिलं आहे.

तीन वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानमधील घराचा उल्लेख केला होता. या घराशी दिलीप कुमार भाविनकरित्या जोडलेले होते, असं त्यांनी सांगितलं होतं. “मी काही वर्षांपूर्वी या घराला भेट दिली होती, त्यावेळी दिलीप कुमार यांना तिथं जाऊन झालेला आनंद व अभिमान मला बघता आला होता. ते खूप भावुक झाले होते, कारण या घरात त्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर त्यांचं सुंदर बालपण घालवलं होतं,” असं त्या म्हणाल्या होत्या.

“ते मला हातोड्याने मारायचे”, प्रसिद्ध अभिनेत्याचा वडिलांबद्दल खुलासा; म्हणाले, “ब्राह्मण असल्याने मी शेती…”

पेशावरच्या किस्सा खवानी बाजार परिसरात मोहम्मद युसूफ खान म्हणून त्यांचा जन्म झाला होता. नंतर त्यांनी स्वतःचं नाव बदलून दिलीप कुमार ठेवलं होतं. त्यांच्या पालकांचं नाव आयशा बेगम आणि लाला गुलाम सरवर खान होतं. ते त्याकाळचे जमीनदार आणि फळ व्यापारी होते.